नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या स्मार्टफोनचा आज (२३ फेब्रुवारी) पहिला सेल सुरू होणार आहे. या नवीन हँडसेटला 9 Pro सीरिजच्या फोनसोबत लाँच करण्यात आले होते. या फोनला तुम्ही रियलमीची अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. Realme 9 Pro 5G मध्ये १२० हर्ट्ज डिस्प्ले दिला आहे. तसेच, क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ६९५ SoC चा सपोर्ट मिळतो. स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ३३ वॉट डार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. Realme 9 Pro 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. वाचा: Realme 9 Pro 5G ची किंमत आणि सेल ऑफर्स भारतात Realme 9 Pro 5G च्या ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये, तर ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २०,९९९ रुपये आहे. Realme 9 Pro 5G ला तुम्ही ऑरोरा ग्रीन, मिडनाइट ब्लॅक आणि सनराइज ब्लू शेड्समध्ये खरेदी करू शकता. Realme 9 Pro 5G वर आकर्षक ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. एचडीएफसी बँकेच्या कार्डचा उपयोग करून खरेदी केल्यास २ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. तसेच, फ्लिपकार्टवर Realme 9 Pro 5G च्या खरेदीवर ४ हजार रुपये स्पेशल डिस्काउंट दिले जात आहे. यासोबतच, बजाज फिनसर्व्ह आणि ठराविक क्रेडिट कार्डवर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे. Realme 9 Pro 5G ला तुम्ही ३ हजार रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. Realme 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन Realme 9 Pro 5G हा अँड्राइड १२ आउट-ऑफ-द-बॉक्सवर काम करतो. यामध्ये ६.६ इंच फुल-एचडी+ एलसीडी पॅनेल दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ६९५ SoC, एड्रेनो ६१९ जीपीयूसह ८ जीबीपर्यंत रॅम मिळते. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ वी५.२, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅकचा समावेश आहे. Realme 9 Pro 5G मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट डार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tUoQkPq