Full Width(True/False)

Valentines Day वर धुमाकूळ घालायला येतोय कमी किंमतीतील आणखी एक 5G स्मार्टफोन

नवी दिल्ली: भारतात आपला नवीन Infinix Zero 5G ला १४ फेब्रुवारीला लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, लाँचआधी इनफिनिक्सच्या या ५जी फोनच्या फीचर्सचा खुलासा झाला आहे. या डिव्हाइसमध्ये डायमेंशन ९००, १३ ५जी बँड, LPDDR५ रॅम आणि UFS ३.१ स्टोरेज सारखे फीचर्स दिले जातील. आता नवीन लीकमध्ये फोनच्या सर्वच फीचर्सची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, झिरो ५जी मध्ये ६.७ इंचाचा FHD + डिस्प्ले दिला जाईल, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४६० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. यात फ्रंटला ड्यूल एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. वाचा: मध्ये फोटोग्राफीसाठी रियर कॅमेरा सेटअपमध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ एक्स झूम सपोर्टसह १२ मेगापिक्सल लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळेल. रियर कॅमेरे ड्यूल एलईडी फ्लॅशसह येतील. फोनमध्ये डायमेंशन ९०० सह ६ जीबी / ८ जीबी रॅम दिली जाईल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये १२८ जीबी स्टोरेज मिळेल. तर पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाऊ शकतो. Infinix Zero 5G च्या किंमतीबद्दल सांगायचे तर या स्मार्टफोनला भारतात २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमत सादर केले जाईल. या किंमतीसह हा फोन Tecno POVA 5G, Lava AGNI 5G, Redmi Note 11T, Realme 8s 5G आणि अपकमिंग Realme 9 Pro सारख्या ५जी स्मार्टफोन्सला टक्कर देईल. लाँचिंगनंतर हा हँडसेट फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होईल. वाचा वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ctRw35e