Full Width(True/False)

प्रतिक्षा संपली! दमदार फीचर्ससह सर्वात स्वस्त 5G iPhone अखेर लाँच, जाणून घ्या भारतातील किंमत

नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी ने आपल्या एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये बहुप्रतिक्षित SE (2022) ला अखेर लाँच केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची चर्चा सुरू होती. अखेर, कंपनीने या फोनला सादर केले आहे. हा फोन एप्रिल २०२० मध्ये आलेल्या iPhone SE (2020) चे अपग्रेड मॉडेल आहे. नवीन iPhone SE 5G कनेक्टिव्हिटी आणि सर्वात पॉवरफुल ए१५ बायोनिक चिपसह येतो. याशिवाय एसई (२०२२) मध्ये फोटोग्राफीसाठी शानदार रियर कॅमेरा कॅमेरा देखील दिला आहे. याआधीचे मॉडेल ४जी सपोर्ट आणि ए१३ बायोनिक चिपसह येते. मात्र, नवीन मॉडेलला कंपनीने पूर्णपणे अपग्रेड केले आहे. iPhone SE (2022) च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. वाचा: iPhone SE 2022 ची भारतातील किंमत अमेरिकेत iPhone SE (2022) ची किंमत ४२९ डॉलर्स म्हणजे ३३,००० रुपयांपासून सुरू होते. तर भारतात या फोनची सुरुवाती किंमत ४३,९०० रुपये आहे. भारतात iPhone SE (2022) चे बेस व्हेरिएंट ६४ जीबी मॉडेलसाठी ४३,९०० रुपये खर्च करावे लागतील. तर फोनच्या १२८ जीबी आणि २५६ जीबी व्हेरिएंटची क्रमशः किंमत ४८,९०० रुपये आणि ५८,९०० रुपये आहे. iPhone SE (2022) चे बुकिंग भारतासह अनेक बाजारात शुक्रवारपासून सुरू होईल. तसेच, ग्राहक फोनला प्री-ऑर्डर देखील करू शकता. फोन १८ मार्चपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. iPhone SE 2022 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स नवीन मध्ये ४.७ इंच रेटिना एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७५०x१,३३४ पिक्सल आहे. हा स्वस्त आयफोन आयओएस १५ वर काम करतो. यामध्ये पॉवरफुल ए१५ बायोनिक चिप दिली आहे. हीच चिप आयफोन १३ सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये देखील पाहायला मिळते. या स्मार्टफोनमध्ये पुढील व मागील बाजूस मजबूत ग्लास देण्यात आला आहे. iPhone SE 2022 मध्ये फोटोग्राफीसाठी देखील शानदार कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी एफ/२.२ लेंससह फ्रंटला ७ मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे. फोनमध्ये तुम्ही ६०fps पर्यंत ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. तर बॅक पॅनेलवर १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये Touch ID आणि IP६७ रेटिंग देखील आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/py3nzFw