मुंबई : हा बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. कार्तिकचं एकूण व्यक्तिमत्त्व चाहत्यांना विशेष करून तरुणींना भुरळ पाडणारं असं आहे. त्यामुळेच कार्तिक लाखो तरुणींचा आवडता आहे. आपल्या लाडक्या कलाकारासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. असाच अनुभव कार्तिकला देखील आला आहे. कार्तिक आर्यनच्या एका चाहतीनं चक्क त्याला लग्नाची मागणी घातली ,इतकंच नाही तर त्यासाठी तब्बल २० कोटी रुपयांची ऑफरही दिली आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या एका व्हिडिओवर चाहतीनं ही मागणी केली आहे. कार्तिकचा व्हिडिओ कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक त्याच्या चिमुरडी चाहती इयात वर्मा हिच्याशी बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत कार्तिकनं लिहिलं आहे की, 'क्युटेस्ट अर्जुन पाठक...' कार्तिकनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर युझर्सनी भरभरून कॉमेन्ट करायला सुरुवात केली आहे. काही युझर्सनी या चिमुकल्या महिला चाहतीच्या निरागसपणाचं कौतुक केलं आहे. परंतु या व्हिडिओवर कार्तिकच्या एका महिला चाहतीनं कमेन्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काय होती कॉमेंट? कार्तिकनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्याच्या महिला चाहतीनं थेट त्याला लग्नाचीच मागणी घातली आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिनं लिहिलं की, 'तर आता माझ्याशीच लग्न कर. मी तुला २० कोटी रुपये देईन.' या महिला चाहतीनं केलेल्या कमेन्टवर कार्तिकनं देखील लगेचच उत्तर दिलं आहे. त्यानं खूप साऱ्या इमोजी शेअर करत 'कधी?' असा प्रश्न विचारला आहे. कार्तिक आर्यनकडे अनेक सिनेमांचे प्रोजेक्टस् आहेत. त्याच्या चित्रीकरणात तो व्यग्र आहे. परंतु चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी तो आवर्जून वेळ काढतो. कार्तिकच्या घराखाली अनेकदा त्याच्या महिला चाहत्यांची गर्दी असते. त्यांना देखील कार्तिक आवर्जून भेटतो. मध्यंतरी त्याच्या अशाच दोन महिला चाहत्या घराबाहेर उभ्या राहून त्याच्या नावानं ओरडत होत्या. तेव्हा कार्तिक खाली आला आणि त्यांच्यासोबत फोटो काढले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/qmPSN49