Full Width(True/False)

'या' दिवशी लाँच होणार Realme Narzo 50A Prime, फ्लॅट एजसह मिळतील 'हे' खास फीचर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: लवकरच होणार आहे. फोन लाँच करण्यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर डेडिकेटेड मायक्रोसाइटनुसार, स्मार्टफोन GT 2 Pro, Realme Narzo 50 आणि Realme Buds Air 3 सोबत लाँच करण्यात येणार आहे. Realme Narzo 50A Prime चे काही मुख्य वैशिष्ट्य मायक्रोसाइटमध्ये सांगण्यात आले आहे. त्याचे डिझाईन इमेज सुद्धा दिसत आहे. कंपनीने मायक्रोसाइटवर केली घोषणा: कंपनी हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच करणार असून कंपनीने अधिकृत वेबसाइटवर डेडीकेटीड मायक्रोसाइटद्वारे याची घोषणा केली आहे. नमूद केल्याप्रमाणे, Realme स्मार्टफोन २२ मार्च रोजी Realme GT 2 Pro, Realme Narzo 50 आणि Realme Buds Air 3 सोबत सादर करण्यात येईल. कंपनीने अद्याप Realme Narzo 50A प्राइमच्या भारतातील लाँचबद्दल काहीच कन्फर्म केले नाही. वाचा: स्मार्टफोन दोन रंगात येणार: मायक्रोसाइटवरील इमेजनुसार, Realme Narzo 50A Prime दोन रंग पर्यायांमध्ये ऑफर केले जाईल - ब्लॅक आणि ब्लू. हे Device तीन बाजूंनी पातळ बेझल आणि थोडी जाड चिन असलेल्या सपाट डिस्प्लेसह दर्शविले आहे. सेल्फी कॅमेर्‍यासाठी वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचसह डिस्प्ले देखील दर्शविला आहे. मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि आयताकृती मॉड्यूलमध्ये फ्लॅशसह आहे. इमेजनुसार, Realme Narzo 50A Prime ला उजवीकडील पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट सेन्सरसह फ्लॅट फ्रेम मिळेल. व्हॉल्यूम बटणे इमेजमध्ये दिसत नाहीत. परंतु, ती डावीकडे असू शकतात, जसे अनेक Realme स्मार्टफोन्सच्या बाबतीत आहे. स्मार्टफोनच्या तळाशी ३.५ mm हेडफोन जॅक, USB Type-C पोर्ट आणि स्पीकर ग्रिल मिळेल. Realme Narzo 50A Prime चे वैशिष्ट्य (अपेक्षित): मायक्रोसाइटने आगामी Realme Narzo 50A प्राइमचे काही प्रमुख वैशिष्ट्य देखील शेयर केले आहे . यात ६.६ इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले मिळेल. मागील बाजूस ५० मेगापिक्सेल AI प्रायमरी कॅमेरा उपलब्ध असेल. मायक्रोसाइटने असेही नमूद केले आहे की, Narzo 50 मालिका स्मार्टफोनला "मोठी पॉवर " मिळत आहे, जी मोठी बॅटरी दर्शवते. परंतु, कंपनीने येथे क्षमतेचा उल्लेख केलेला नाही. मागील रिपोर्टनुसार, यात १८ W चार्जिंग सपोर्टसह ४८९० mAh बॅटरी मिळेल. मागील आणखी एका अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, Realme Narzo 50A प्राइमचे स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 स्किन बूट करेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vTh7QSP