Full Width(True/False)

१२ GB रॅमसह येणारा Oppo चा 'हा' 5G स्मार्टफोन स्वस्तात बनेल तुमचा, मिळतोय १० हजारांपेक्षा अधिक डिस्काउंट

नवी दिल्ली: गेल्या काही आठवड्यांमध्ये भारतात अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले असून आता युजर्सना फोन निवडण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहे. स्मार्टफोन खरेदी करताना दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे बजेट आणि आवश्यक फीचर्स. तुम्हीही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला महागडा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Amazon आणि Flipkart सारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नवीन लाँच केलेल्या मॉडेलवर ऑफर देत आहे. जर तुम्ही खरेदी करण्याची वाट पाहत असाल तर, Flipkart फोनवर डिस्काउंट, एक्सचेंज आणि बँक ऑफर देत आहे. ४७,९९० रुपये किंमतीचा हा फोन तुम्ही फक्त २६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जाणून घ्या Oppo Reno 7 Pro 5G वर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल. वाचा: Oppo Reno 7 Pro 5G: १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेजसह Oppo Reno 7 Pro 5G फ्लिपकार्टवर १७ % सूटसह उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्ही हा फोन ३९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता आणि ७,९९१ रुपये वाचवू शकता. तुम्ही एक्सचेंजेस आणि बँक ऑफर्सद्वारे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी करू शकता. एक्सचेंजद्वारे Oppo Reno 7 Pro 5G खरेदी केल्यास, तुम्ही फोनवर १३,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. त्यामुळे फोनची किंमत २६,९९९ रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. तुम्हाला फक्त तुमच्या लोकेशनवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे की, नाही ते तपासावे लागेल. यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाइटवर तुमच्या क्षेत्राचा पिनकोड टाकावा लागेल. Oppo Reno 7 Pro 5G वर उपलब्ध ऑफर्स: BOB क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १० % पर्यंत इन्स्टंट सूट देण्यात येत आहे. तसेच, स्टँडर्ड चार्टर्ड क्रेडिट ईएमआय, डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १० % पर्यंत इन्स्टंट सूट मिळेल. SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ३००० रुपयांची सूट आणि येस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर १० % पर्यंत इन्स्टंट सवलतीचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. ५००० आणि त्याहून अधिकच्या ऑर्डरवर SBI क्रेडिट कार्ड्सवर (७५० रुपयांपर्यंत) १० % सूट उपलब्ध आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ % अमर्यादित कॅशबॅक मिळेल. तर, SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर तुम्ही २५० रुपयांची सवलत मिळवू शकता. Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. यामध्ये १२ जीबी रॅमसह मीडियाटेक डायमेंसिटी १२०० मॅक्स चिपसेटचा सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रियरला ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप तर, सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lrJgqzS