Full Width(True/False)

गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत 'हे' स्वस्त स्मार्टफोन्स, किंमत ५ हजारांपेक्षा कमी, फीचर्स सुपरहिट, पाहा लिस्ट

नवी दिल्ली: जर तुम्हाला तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना फोन गिफ्ट करायचा असेल तर, सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, कमी बजेट असणाऱ्यांसाठी देखील आजकाल अनेक भन्नाट स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहो. जे ५००० रुपयांपेक्षा स्वस्त आहेत. या स्मार्टफोन्सची रॅम, डिस्प्ले आणि इंटरनल मेमरीसह इतर डिटेल्सची माहिती पाहा. लिस्टमध्ये पहिले नाव आहे Itel A23 Pro चे. या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वाड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये २४०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, फोनमध्ये २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. Itel A2 Pro मध्ये१ GB रॅमसह ८ GB इंटर्नल मेमरी आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत ३७४० रुपये आहे. वाचा: कूलपॅड मेगा 5M: या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये २००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, फोनमध्ये ५ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Coolpad Mega 5M मध्ये १ GB RAM सह १६ GB इंटर्नल मेमरी आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत ४४९० रुपये आहे . Itel A25: या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वाड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये ३०२० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये ५ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Itel A25 मध्ये १ GB RAM सह १६ GB इंटर्नल मेमरी आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत ४६७५ रुपये आहे. LAVA Z1s: या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते. तसेच, स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने तुम्ही २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात ५ इंचाचा शानदार FWVGA+ डिस्प्ले दिला आहे. याशिवाय फोटोग्राफीसाठी ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसेच, LAVA Z1s स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ३१०० एमएएचची बॅटरी मिळते. फ्लिपकार्टवर LAVA Z1s ची किंमत ४६९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wci3G4H