नवी दिल्ली: सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड () खासगी कंपन्या , आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी अनेक शानदार प्लान्स आणत आहेत. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्रीपेड प्लान्सवर एक खास ऑफर देत आहे. या ऑफरचा लाभ ३१ मार्च २०२२ पर्यंत घेता येईल. ही ऑफर दोन प्रीपेड प्लान्सवर उपलब्ध असून, याची किंमत थोडी जास्त आहे. बीएसएनएलच्या या दोन्ही प्लान्समध्ये अतिरिक्त वैधतेचा फायदा मिळतो. या प्लान्सची किंमत २,९९९ रुपये आणि २,३९९ रुपये आहे. कंपनीच्या या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: बीएसएनएलचा २,९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान बीएसएनएल आपल्या २,९९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ९० दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. म्हणजेच, यूजर्सला तीन महिने मोफत प्लानमधील सुविधांचा लाभ घेता येईल. ही ऑफर ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू आहे. या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. सोबतच, ९० दिवसांची अतिरिक्त वैधता मिळून एकूण ४५५ दिवस या प्लानचा लाभ घेता येईल. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये यूजर्सला दररोज ३ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये दररोजचा खर्च फक्त ६.५९ रुपये आहे. बीएसएनएलचा २,३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान बीएसएनएलच्या २,३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. परंतु, ३१ मार्च २०२२ पर्यंत या स्पेशल ऑफर अंतर्गत यूजर्सला ६० दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. अशाप्रकारे यूजर्स एकूण ४२५ दिवस प्लानचा लाभ घेऊ शकतात. या प्लानमध्ये यूजर्सला एकूण २ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लानचा दररोजचा खर्च फक्त ५.६४ रुपये आहे. दरम्यान, या दोन्ही प्लान्समध्ये अतिरिक्त वैधता मिळत असल्याने हे रिचार्ज फायद्याचे ठरतात. इतर खासगी कंपन्यांच्या तुलनेत हे प्लान्स स्वस्त आहेत. मात्र, खासगी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे ४जी नेटवर्कचा आहे. बीएसएनएलकडे सध्या ४जी उपलब्ध नाही. याबाबत कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्विसेज आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्ससोबत काम करत आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HjEa4tT