Full Width(True/False)

Jio ला टक्कर, फक्त ३९९ रुपयांमध्ये 'ही' कंपनी देतेय हाय स्पीड इंटरनेट आणि अनलिमिटेड डेटा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: इंटरटनेट आणि वर्क फ्रॉम होम कल्चर वाढल्यामुळे देशात ब्रॉडबँडची मागणी खूप वाढली आहे. परिणामी, कंपन्या देखील परवडणारे प्लान्स ग्राहकांना उपलब्ध करून देत असून त्यामध्ये एक प्रकारे स्पर्धा देखील सुरु झाली आहे.अशात जर तुम्ही स्वस्त, उच्च-गुणवत्तेचे फायबर ब्रॉडबँड शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. येथे आपण Excitel आणि JioFiber च्या प्लान्सबद्दल बोलत आहोत. Excitel ,JioFiber, आणि BSNL भारत फायबरला टक्कर देत आहे. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्याच वेळी, Excitel चा ब्रॉडबँड प्लॅन JioFiber च्या प्लानपेक्षा अधिक परवडणारा आहे. Excitel Vs JioFiber Plan: Excitel युजर्सना तीन ब्रॉडबँड प्लान ऑफर करते. हे प्लान्स १०० Mbps, २०० Mbps आणि ३०० Mbps डाउनलोड/अपलोड गतीसह येतात. वाचा: कंपनी युजर्सना वाजवी-वापर-पॉलिसी (FUP) मर्यादेवर कोणत्याही निर्बंधाशिवाय अनलिमिटेड डेटा प्रदान करत असल्याचे सांगते. Excitel प्लान्स :१०० Mbps स्पीडसह बेस प्लान ६९९ रुपये प्रति महिना येतो. तर, २०० Mbps आणि ३०० Mbps प्लान अनुक्रमे ७९९ रुपये आणि ८९९ रुपये प्रति महिना आहेत. Excitel सर्वात स्वस्त २०० Mbps आणि ३०० Mbps ब्रॉडबँड प्लान्स ऑफर करते. तुम्ही वैधतेची निवड जितकी जास्त कराल तितका प्लान स्वस्त होईल. अशाप्रकारे, जर तुम्ही १२ महिन्यांसाठी १०० Mbps स्पीडचा प्लान घेतला, तर दर महिन्याला ६९९ रुपये भरण्याऐवजी तुम्हाला दर माह ३९९ रुपये (१२ महिने x ३९९ रुपये) द्यावे लागतील. J ioFiber च्या १०० Mbps प्लानचे फायदे: JioFiber चा १०० Mbps प्लान Excitel च्या १०० Mbps प्लान (६९९ रुपये प्रति महिना) सारख्याच किमतीत उपलब्ध आहे. JioFiber दरमहा डेटा मर्यादेवर ३.३ TB कॅप ठेवते. तर, Excitel अनलिमिटेड डेटा ऑफर करते. याशिवाय, द्वारे ऑफर केलेले अनेक OTT फायदे आहेत. सर्वोत्तम कोण आहे? आजकल युजर्स ब्रॉडबँड प्लान खरेदी करण्यापूर्वी इतर कंपन्यांच्या प्लान्समध्ये मिळणारे बेनिफिट्स देखील आवर्जून तपासतात. अशात, जर तुम्ही पॉकेट-फ्रेंडली हाय-स्पीड ब्रॉडबँड प्लान शोधत असाल तर Excitel, JioFiber पेक्षा चांगली निवड ठरेल . तुम्हाला OTT लाभ देखील हवा असेल तर तुम्ही Excitel कडून ३ महिन्यांसाठी ३०० Mbps ब्रॉडबँड प्लान खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LDwJBCi