Full Width(True/False)

लग्नात सिंदूर लावलं म्हणून ट्रोल झाली गायिका अफसाना खान

मुंबई- बिग बॉस १५ ची माजी स्पर्धक आणि पंजाबी गायिका ने तिचा प्रियकर साजसोबत नुकतेच लग्न केले. अफसाना आणि साज यांनी १९ फेब्रुवारी रोजी लग्न केले, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त, जवळच्या मित्र- मैत्रिणींनीही हजेरी लावली होती. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. लग्नानंतर अफसाना खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या लग्न आणि रिसेप्शन संबंधित फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. दरम्यान, अफसानाने चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गायिकेने भांगेत सिंदूर घातलेलं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्स चांगलेच संतापले आहेत आणि प्रत्येकजण गायिकेला नावं ठेवत आहे. अफसाना खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गायिका पती साजसोबत स्टेजवर येताना दिसत आहे. यादरम्यान अफसानाने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. अफसानाने दागिने आणि मेकअपसोबत आपला लुक पूर्ण करण्यासाठी सिंदूर लावलं होतं. पण अफसानाचा हा लुक पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. अनेकांनी गायिकेच्या या लुकचं कौतुक केलं. पण काही लोक गायिकेला आता ट्रोल करत आहेत. अफसानाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया युझर्स प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक गायिकेची खिल्ली उडवत आहेत, तर काही तिला शिव्या देत आहेत. इतकेच नाही तर अनेक लोक अफसानाच्या धर्मावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'तू सिंदूर का लावलं आहेस? तू मुस्लिम आहेस.’ दुसऱ्या युझरने लिहिले, ‘तू मुस्लिम आहेस की हिंदू? मुस्लिम नाव आणि हिंदूचं सर्व काम. अल्लाह या जगात लोक कसे आहेत.'' आणखी एका युजरने अफसानासाठी 'लाज वाटली पाहिजे' असे शब्दही वापरले आहेत. मात्र, यावेळी अफसाना खानच्या चाहत्यांनीही गायिकेचे कौतुक केले. एका चाहत्याने लिहिले की, 'हिंदू लोक लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासून सिंदूर लावणं बंद करतात, पण अफसाना खानने प्रत्येक वेळी सिंदूर लावलं आहे.' याशिवाय चाहते अफसानाच्या लुकचंही कौतुक करत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. अफसाना खानला 'बिग बॉस १५' मधून लोकप्रियता मिळाली. अफसाना या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र, गैरवर्तनामुळे तिला शोमधून बाहेर काढण्यात आले. पण या सीझनमध्ये दिसलेल्या अनेक सेलिब्रिटींनी अफसानाच्या लग्नाला हजेरी लावली होती, ज्यात राखी सावंत, अक्षरा सिंग, डोनल बिश्त यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. अनेकांनी अफसानाच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/aycdexQ