Full Width(True/False)

Jio देत आहे खास सुविधा, फोनमध्ये सिम न टाकताच करता येईल कॉल; एकाचवेळी वापरू शकता ५ मोबाइल नंबर

काही वर्षांपूर्वी दोन सिम कार्डचा वापर करण्यासाठी दोन वेगवेगळे फोन्स खरेदी करावे लागत असे. परंतु, आता बहुतांश स्मार्टफोन्समध्ये ड्यूल सिम सपोर्ट मिळतो. ड्यूल सिम सपोर्ट असल्याने दोन मोबाइल नंबर वापरता येतात. अनेकजण दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्ड वापरत असतात. मात्र, तुम्ही एकाच फोनमध्ये तब्बल ५ सिम म्हणजेच फोन नंबरचा वापर करू शकता. तुम्हाला कदाचित याचे आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे. हे सर्व eSIM सपोर्टमुळे शक्य झाले आहे. स्मार्टफोन कंपन्या आपल्या हँडसेटमध्ये ई-सिमचा सपोर्ट देत आहे. ई-सिमच्या मदतीने तुम्ही एकाच फोनमध्ये ५ फोन नंबरचा वापर करू शकता. ई-सिम म्हणजेच ईंबेडेड सबस्क्राइबर आयडेंटी मॉड्यूलला थेट फोनमध्ये एम्बेड केले जाते. भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेल्या रिलायन्स जिओच्या ई-सिमचा तुम्ही वापर करू शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​e-SIM वापरण्याचे आहेत अनेक फायदे
​e-SIM वापरण्याचे आहेत अनेक फायदे

e-SIM चे यूजर फोनमध्ये सिम कार्ड न टाकताच टेलिकॉम सर्व्हिसचा वापर करू शकता. सध्या अनेक फोनमध्ये ई-सिम कार्डचा सपोर्ट दिला जात आहे. ई-सिमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही टेलिकॉम ऑपरेटर बदलला तरीही सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. सोबतच, फोनचे नुकसान झाले तरीही याचा सिमवर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही जर Reliance Jio चे यूजर्स असाल तर जवळील जिओ स्टोरवर जावून हे सिम घेऊ शकता. तुम्ही एकाचवेळी ५ नंबर वापरू शकता.

​Jio e-SIM कसे खरेदी कराल?
​Jio e-SIM कसे खरेदी कराल?

रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीने गेल्याकाही वर्षात इतर कंपन्यांना जोरदार टक्कर देत आपल्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. तुम्ही सहज Reliance Jio चे e-SIM खरेदी करू शकता. नवीन कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला Reliance Digital च्या Jio स्टोरवर जावे लागेल. कनेक्शनसाठी तुम्हाला फोटो आणि ओळखपत्राचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही कंपनीच्या वेबसाइट आणि अ‍ॅपवरून जवळील स्टोर शोधू शकता.

​Jio e-SIM ला अ‍ॅक्टिव्हेट कसे कराल?
​Jio e-SIM ला अ‍ॅक्टिव्हेट कसे कराल?

तुम्ही नवीन e-SIM खरेदी केल्यानंतर कंपनीकडून याची संपूर्ण माहिती दिली जाईल. नवीन Jio e-SIM कनेक्शनला सुरू करण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये एक फीचर डाउनलोड करावे लागेल. तसेच, eSIM साठी कंपेटिबल डिव्हाइस ऑटोमेटिकली या सिमला कॉन्फिगर करावे लागेल. तुमच्याकडून जर चुकीने डाउनलोड केलेले ई-सिम हटवण्यात आल्यास, सुरु करण्यासाठी पुन्हा जवळील रिलायन्स डिजिटल आणि जिओ स्टोरवर जावे लागेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन Jio e-SIM कनेक्शन घेत असाल तर कंपनीच्या स्टोरमधून संपूर्ण माहिती घ्या.

​एकाच फोनमध्ये वापरू शकता ५ नंबर
​एकाच फोनमध्ये वापरू शकता ५ नंबर

तुम्ही ई-सिम सपोर्ट करणारे डिव्हाइस खासकरून आयफोनमध्ये एकाचवेळी अनेक ई-सिम वापरू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही फिजिकल स्लॉटमध्ये एक सिम वापरू शकता. तर दुसऱ्या व्हर्च्यूअल ई-सिम स्लॉटमध्ये इतर ई-सिमचा (भारतात जिओ ही सुविधा देते) वापर करू शकता. लक्षात घ्या की एका वेळी एकच ई-सिम काम करेल. परंतु, तुम्ही कधीही इतर ई-सिममध्ये स्विच करू शकता. जिओ वेबसाइटनुसार, एका डिव्हाइसमध्ये अनेक ई-सिम प्रोफाइल बनवता येतात. परंतु, एका डिव्हाइसमध्ये केवळ ३ ई-सिम वापरण्याचा सल्ला दिला जातो.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WBcGZQM