Full Width(True/False)

शाहरुख, इरफान आणि विद्याच्या मालिकांची नावं आठवतात का?

मुंबई- प्रत्येक अभिनेत्याचं असं स्वप्न असतं की आपल्या अभिनयाची सुरुवात ही मोठ्या पडद्यावरून व्हायला हवी. परंतु बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली. त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने आपल्या स्व-बळावर या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपली जागा बनवली आहे. या कलाकारांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे, त्या लोकप्रिय मालिका ठरल्या आहेत, जाणून घ्या कोणते कलाकार आहेत या यादीत. मंदिरा बेदी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री मंदिरा बेदीने छोट्या पडद्यावरील 'शांती' या मालिकेतही काम केलं आहे. सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या विद्या बालनने छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ही अभिनेत्री झी टीव्हीची प्रसिद्ध मालिका 'हम पांच'मध्ये दिसली होती. यामी गौतम 'विकी डोनर' आणि 'उरी' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री यामी गौतमनेही मालिकेतूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यामीने 'चांद के पार चलो' आणि 'ये प्यार ना होगा कम' मध्ये काम केलं आहे. सुशांतसिंह राजपूत आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता'तूनही प्रसिद्ध झाला. छोट्या पडद्यावर नाव कमावल्यानंतर त्याने 'काई पो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं होतं. किंग खान शाहरुख खानने 'दिवाना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांचा हा चित्रपट सुपर हिट ठरला. आज शाहरुख खान बॉलिवूडमधला लोकप्रिय कलाकारांच्या यादीत येतो.पण त्यांने त्याच्या अभिनयाची सुरूवात छोट्या पडद्यावरील 'सर्कस' आणि 'फौजी' मालिकेतून केली. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता इरफान खान आज आपल्यात नाही, परंतु त्याने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा तयार केली आहे. चित्रपट क्षेत्रात कार्यरत होण्याआधी इरफानमं चंद्रकांतासारख्या मालिकेत काम केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/YCvAnaG