Full Width(True/False)

पहिल्यांदा एकत्र दिसणार अक्षय कुमार आणि विद्युत जामवाल

मुंबई : छोट्या पडद्यावरून प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या बरोबरीने रिअॅलिटी शो देखील तितक्याच आवडीने पाहिले जातात. त्यामुळे विविध वाहिन्यांवरून वेगवेगळ्या धाटणीचे अनेक रिअॅलिटी शो प्रसारित केले जातात. या शो नादेखील प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत असतात. प्रेक्षकांची ही आवड लक्षात घेऊन 'इंडियाज अनलिमिटेड वॉरिअर' हा कार्यक्रम डिस्कव्हरी प्लस चॅनलवर १४ मार्च पासून प्रसारित केला होणार आहे. 'इंडियाज अनलिमिटेड वॉरिअर' या रिअॅलिटी शोमध्येचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता करणार आहे. या कार्यक्रमात विद्युतबरोबर चार एक्सपर्ट असतील. या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात एकूण १६ स्पर्धक दिसणार आहेत. ज्यांचे दोन संघात विभागणी केली जाणार आहे. या शोची खास गोष्ट म्हणजे यात मुला-मुलींमध्ये द्वंद्व होणार आहे. म्हणजे एक टीम मुलांची आणि एक टीम मुलींची असणार आहे. या दोन टीममध्ये होणाऱ्या स्पर्धेतील टास्कमध्ये कोण सर्वोत्तम असेल ते दाखवले जाईल. आणि विद्युत जामवाल एकत्र स्क्रिन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. 'इंडियाज अल्टीमेट वॉरिअर' चा प्रोमो ट्विटरवर शेअर करताना विद्युतने लिहिले की, 'योद्धा तो असतो जो आपल्या शरीरातील प्रत्येक गोष्ट अनुभवतो, हे जाणून घेतो की हा त्याचा स्वतःचा अनुभव आहे.' त्याने पुढे लिहिले की, 'अक्षय कुमारला आमच्या शोमध्ये खास पाहुणे म्हणून पाहण्यात खूप मजा आली.' विद्युतने व्हिडिओ शेअर करताच, त्याच्या आणि अक्षय कुमारच्या चाहत्यांनी दोन्ही अॅक्शन स्टार्स एकत्र काम करताना पाहून आनंदी झाले. एका चाहत्याने लिहिले की, 'चला सिनेमा नाही पण एकत्र पाहण्याची संधी तरी मिळाली.' अजून एकाने लिहिले, 'एका फ्रेममध्ये दोन मोठे खिलाडी.' 'इंडियाज अनलिमिटेड वॉरिअर' या रिअॅलिटी कार्यक्रमाटा टिझर प्रदर्शित झाला. त्यामध्ये विद्युत जामवाल आणि या कार्यक्रमात सहभागी स्पर्धक दिसत आहेत. या टिझरमध्ये मुली काही स्टंट करताना दिसत आहेत. त्यानंतर मुला-मुलींच्या टीममध्ये लढत दाखवली आहे. यावेळी प्रत्येक मुलगी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला तगडी स्पर्धा देताना दिसत आहे. या शोमध्ये विद्युत, त्याच्या चार एक्सपर्टसोबत मिळून सर्व स्पर्धकांमध्ये असलेले पाच गुण शोधणार आहेत. लक्ष्य, संयम, दृढनिश्चय, संतुलन आणि शिस्त हे ते पाच गुण आहेत. या शोमध्ये प्रत्येक टास्क दरम्यान, सर्व स्पर्धकांना त्यांचे पाच गुण दाखवावे लागतील आणि जो स्पर्धक यात अयशस्वी ठरेल त्या स्पर्धकाला शोमधून बाहेर केले जाईल. शिफू कनिष्क, मायकेल हॉक, बी ग्युएन अर्थात किलर बी, शॉन कोबेर हे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/R3DFCpq