Full Width(True/False)

बिग बींच्या घरी लावलेल्या बैलाच्या पेन्टिंगची किंमत तरी वाचा..

मुंबई- बॉलिवूड मेगास्टार यांची प्रत्येक गोष्ट खास असते. वयाच्या ७९ व्या वर्षी देखील ते फिट आहेत. आज ते जे काही आहेत ते त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्यातील कौशल्यामुळेच. अमिताभ यांनी स्वत:च्या मेहनतीने 'जलसा' बंगला बांधला. या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने निवडली आहे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घरातील एका बैलाचं पेन्टिंग असलेला फोटो व्हायरल होतं आहे. बरं तुम्हाला जर का हा फोटो साधासा वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात, कारण या पेन्टिंगची किंमत कोटींच्या घरात आहे. अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. त्यांच्यासाठीच बिग बी सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. चाहतेही त्यांच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या घरातील एका बैलाचं पेन्टिंग असलेला फोटो व्हायरल होत आहे, ज्याची किंमत जवळपास ४ कोटी रुपये आहे. बसला ना तुम्हाला धक्का.. पण हे खरं आहे. दिवाळीच्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी एक कौटुंबिक फोटो शेअर केला होता. यात त्यांच्या मागे असलेल्या बैलाचं पेन्टिंग खूप चर्चेचा विषय झालं. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ यांच्या जलसा बंगल्यामधील हे पेन्टिंग प्रसिद्ध चित्रकार 'मनजीत बावा' यांनी काढलं आहे. याची किंमत ४ कोटी रुपये आहे. जर का हे पेन्टिंग बिग बींच्या घरात लावलं आहे तर त्यात नक्कीच काही तरी खास असेल आणि याचसाठी त्यांनी ४ कोटी एवढी किंमतही मोजली असेल. या बैलाच्या पेन्टिंगमध्ये काय खास आहे? बैल हा कला, शक्ती, आशा आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो. घर किंवा ऑफिसमध्ये बैलाचं पेन्टिंग लावल्याने आर्थिक उन्नती होते असे म्हणतात. धावत्या बैलाची वेगवान हालचाल जीवनातील प्रगती दर्शवते. व्हाईट बुल आर्टमुळे घर आणि कुटुंबात शांतता, सकारात्मक आणि ऊर्जादेखील पसरते. तर दुसरीकडे असंही म्हटलं जात की, भारतीय संस्कृतीत बैल आणि इतर प्राण्यांना देवी-देवता मानलं जातं. बैल हे शिवाचं वाहन आहे ज्याला नंदी म्हणून ओळखलं जातं. नंदी बैलाची पूजा केली जाते, देशभरातील अनेक मंदिरांमध्ये नंदी बैलाची मूर्ती स्थापित केल्या जातात. असे म्हणतात की नंदीच्या कानात आपण इच्छा व्यक्त केली की ती थेट शिवापर्यंत पोहोचते आणि ती नक्कीच पूर्ण होते. अमिताभ यांच्या घरात असलेल्या या बैलाचं चित्र तयार करणारे मनजीत बावा यांच्याबद्दल सांगायचं तर ते आता या जगात नाहीत. २००८ साली त्यांचे निधन झाले. मनजीत बावा हे पंजाबचे रहिवासी होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ प्रिंटिंगमध्ये शिक्षणं घेतलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/IkRKMmg