मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आजाराबद्दल खुलासा केला. या आजाराबद्दल कळल्यावर चाहतेही चिंतेत पडले. शाह यांनी सांगितले की ते () नावाच्या आजाराशी झुंज देत आहेत. यामुळे ते कधीच शांततेत राहू शकत नाही. ओनोमॅटोमॅनिया हा एक असा आजार आहे ज्यात एखादी व्यक्ती एक शब्द, वाक्य किंवा भाषण गरज नसतानाही वारंवार बोलत राहतो. नसीरुद्दीन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना शांतपणे जगायचे असले तरी या समस्येमुळे ते जगू शकत नाहीत. नसीरुद्दीन शाह यांनी 'चलचित्र टॉक्स' या यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना या आजाराबद्दल सांगितलं. 'सरफरोश', 'मोहरा' आणि 'ए वेनस डे' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसलेले नसीरुद्दीन म्हणाले की, 'मी ओनोमेटोमॅनिया नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. हा एक असा आजार आहे, ज्यात तुम्ही अनावश्यकपणे एखादा शब्द किंवा वाक्य पुन्हा पुन्हा बोलत राहता. शांत रहायचं ठरवलं तरी ते मला शक्य नसतं. मी कधीही आरामात बसू शकत नाही. मी झोपेत असताना किंवा विचारांमध्ये असताना माझी काही आवडती वाक्य किंवा लेख बोलत राहतो. नसीरुद्दीन शाह अलीकडेच पत्नी रत्ना पाठक शाह यांच्यासोबत मेहुणी सुप्रिया पाठक यांच्या मुलीच्या लग्नात सहभागी झाले होते. सुप्रिया पाठक ही शाहिद कपूरची आई आहे. नसीर यांच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर नसीरुद्दीन शाह यांनी १९७५ मध्ये 'निशांत' चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. सुमारे ४७ वर्षांच्या कारकिर्दीत नसीरुद्दीन यांनी १०० हून अधिक चित्रपट केले आणि त्यात निवडक भूमिका केल्या. अलिकडेच ते दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'गहराइयां' सिनेमात दिसले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/hXmNJsI