नवी दिल्लीः रियलमी Realme कंपनी आपला लेटेस्ट स्मार्टफोन, लाँच करण्यासाठी तयार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन एक बजेट स्मार्टफोन आहे. हा स्वस्त सी सीरीजचा फोन आहे. भारतात या फोनला आज म्हणजेच ७ मार्च रोजी लाँच केले जाणार आहे. या संबंधी रियलमी इंडियाने ट्विट करून माहिती दिली आहे. रियलमी इंडिया ने आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, तुम्ही #NayeZamaneKaEntertainment साठी तयार आहात?, सोबत राहा. #realmeC35 आमच्या अधिकृत चॅनेलवर दुपारी १२.३० वाजता, ७ मार्च रोजी हा फोन लाँच होत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, Realme C35 एक रिफ्रेश डिझाइन, चांगली बॅटरी, चांगला कॅमेरा क्वॉलिटी सोबत येतो. फोनमध्ये काय आहे खास रियलमीने म्हटले की, Realme C35 एक 50MP AI ट्रिपल कॅमेरा सोबत येतो. ज्यात डिटेल्स आणि क्वॉलिटी इमेज कॅप्चर करू शकता. हा रियलमी सी सीरीज लाइन अप मध्ये पहिला फुल एचडी ६.६ इंच स्क्रीन सोबत येतो. Realme C35 मध्ये सुद्धा सी सीरीज रेंज मध्ये सर्वात स्लीम आणि हलका स्मार्टफोन आहे. ज्यात ८.१ मिमी बिल्ड आणि लाइटवेट १८७ जी बॉडी दिली आहे. अजून पर्यंत ही माहिती समोर आली नाही. परंतु, Realme C35 ला बॉक्सच्या आत स्टँडर्ड चार्जर सोबत Android 11 आणि 4500mAh ची बॅटरी मिळू शकते. फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, फोन सुपर पॉवर सेविंग मोड आणि १८ वॉट पॉवर अडाप्टर सोबत येतो. Realme C35 16.7cm (6.6 इंच) FHD फुलस्क्रीन अल्ट्रा-हाय रेजोल्यूशन डिस्प्ले सोबत येतो. फोन 600nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, एक मोठी ६.६ इंचाची फुलस्क्रीन आणि 2408*1080 पर्यंत रिझॉल्यूशन सोबत येक फुल एचडी व्हिज्युअल्स एक्सपीरियन्स आनंद घेवू शकता. इतकी असेल किंमत Realme C35 ला २ जीबी आणि ३ जीबी रॅम सोबत लाँच करण्याची शक्यता आहे. याची किंमत ८ हजार ९९९ रुपये पेक्षा कमी असू शकते. वाचाः वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/X2Sj1c3