Full Width(True/False)

३ महिने चालणारे Jio-Airtel-Vi चे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान्स, एक दिवसाचा खर्च फक्त ४.७ रुपये; जाणून घ्या बेनिफिट्स

नवी दिल्ली: खासगी टेलिकॉम कंपन्या , आणि वोडाफोन आयडियाने काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत मोठ्याप्रमाणात वाढ केली होती. मात्र, कंपनीने काही पॉकेट फ्रंडली प्लान्स देखील सादर केले आहे. या कंपन्या अगदी महिन्याभरापासून ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स ऑफर करत आहेत. तुम्ही जर जास्त दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स शोधत असाल तर कंपनीकडे काही चांगले रिचार्ज उपलब्ध आहेत. कंपन्यांकडे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ८४ दिवसांची वैधता ऑफर करणारे प्लान्स आहेत. , आणि च्या अशाच स्वस्त प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Jio चा ३९५ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओकडे ३९५ रुपये किंमतीत येणारा एक शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये कंपनी ८४ दिवसांची वैधता देत आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोमधील ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारा हा सर्वात स्वस्त प्लान आहे. या प्लानचा एक दिवसाचा खर्च फक्त ४.७ रुपये आहे. प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो. या डेटाचा वापर तुम्ही कधीही करू शकता. याशिवाय, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण १००० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये Jio Cinema, जिओ टीव्ही, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या जिओ अ‍ॅप्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. Vodafone Idea आणि Airtel चा स्वस्त प्लान Vodafone Idea कडे ४५९ रुपयांचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो. हा डेटा तुम्ही एकाच दिवशी देखील वापरू शकता. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण १००० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, Vi Movies & TV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. एअरटेलकडे देखील ४५५ रुपयांचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस मिळतात. याशिवाय, Prime Video Mobile Edition, Free Hello tunes, Wynk चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4e73brG