Full Width(True/False)

WhatsApp ने भारतात बॅन केले तब्बल १८ लाख अकाउंट्स, तुमचे अकाउंट तर यात नाही? पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: नवीन IT नियम २०२१ चे पालन करत जानेवारी महिन्यात भारतात १८,५८,००० अकाउंट्सवर बंदी घेतल्याचे मेटा-मालकीच्या तर्फे सांगण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, एका महिन्यात देशभरातून ४९५ तक्रारी आल्या. ज्यापैकी २४ तक्रारींवर जानेवारीमध्ये कारवाई करण्यात आली. "IT नियम २०२१ नुसार, आम्ही जानेवारी २०२२ साठी आमचा ८ वा मासिक अहवाल प्रकाशित केला आहे, असे " WhatsApp प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. "नवीन मासिक अहवालात नोंदवल्याप्रमाणे, व्हॉट्सअॅपने जानेवारीमध्ये १८ लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत," असेही ते म्हणाले. यामुळे बंद: शेअर केलेला डेटा १ ते ३१ जानेवारी दरम्यान गैरवापर शोधण्याच्या पद्धतीचा वापर करून WhatsApp द्वारे प्रतिबंधित केलेल्या भारतीय खात्यांची संख्या हायलाइट करतो. वाचा: ज्यात 'Report Feature ' द्वारे युजर्सकडून मिळालेल्या नकारात्मक गोष्टींचा समावेश आहे. युजर्सचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली: कंपनीने सांगितले की, "गेल्या काही वर्षांपासून, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे. कंपनी करत आहे कारवाई: मेटा (पूर्वीचे Facebook) ने जानेवारीमध्ये Facebook च्या १३ धोरणांमध्ये ११.६ दशलक्षाहून अधिक कन्टेन्ट आणि Instagram साठी १२ धोरणांमध्ये ३.२ दशलक्षाहून अधिक कन्टेन्ट काढून टाकला आहे. नवीन IT नियम २०२१ अंतर्गत, ५ दशलक्षाहून अधिक युजर्स असलेल्या मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मासिक अनुपालन अहवाल प्रकाशित करावा लागतो. ऑक्टोबर २०२१ मध्येही २० लाख अकाउंट्स बंद करण्यात आले होते: व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपने ऑक्टोबर २०२१ मध्ये २० लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली होती. व्हॉट्सअॅपचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत. मेटा-मालकीच्या अॅपने नवीन IT नियम २०२१ चे पालन करून ऑक्टोबरमध्ये भारतात २० लाख अकाउंट्स बॅन केले होते. व्हॉट्सअॅपने आतापर्यंत २१ कोटींहून अधिक व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन केले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dCiq0Wg