टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना अनेक शानदार प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान्स ऑफर करत असते. कंपनीकडे स्वस्त रिचार्ज प्लान्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स व्यतिरिक्त काही स्पेशल रिचार्ज देखील ऑफर करते, जे केवळ खास यूजर्ससाठी आहेत. कंपनीकडे JioPhone वापरणाऱ्या यूजर्ससाठी शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओ JioPhone यूजर्ससाठी वेगळे प्लान्स ऑफर करत असते. विशेष म्हणजे या प्लान्सची किंमत खूपच कमी आहे. कंपनीकडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे प्लान्स काही शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. JioPhone यूजर्ससाठी असणाऱ्या या प्लान्समध्ये डेली डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लान्सची किंमत १८६ रुपये, १५२ रुपये, ७५ रुपये आणि १२५ रुपये आहे. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tkpFygQ