मुंबई-गोलमाल हा असा एक सिनेमा आहे जो तुम्हाला पोट धरून हसवायला भाग पाडतो. प्रेक्षकांना गोलमाल इतका आवडला की त्याचे अनेक भाग आले. सिनेमा २०१० मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात करिना कपूर, अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी यांनी एकत्र धमाल केली होती. पण या चित्रपटात असं एक पात्र होतं, ज्याशिवाय सिनेमा पूर्णच होऊ शकणार नाही. सिनेमाच्या क्लायमॅक्सला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या वसुली भाईचे तर या सीनमुळे लाखो चाहते झाले. यांनी वसुली भाईची भूमिका साकारली होती. पण गेल्या काही वर्षात मुकेश यांचा लुक पूर्णपणे बदलला आहे. आता वसुली भाई कसे दिसतात ते पाहू.. या १२ वर्षांत म्हणजेच मुकेश तिवारी यांचा लुक खूप बदलला आहे. त्याचे चाहते देखील त्यांना अशा लुकमध्ये पाहून थक्क झाले आहेत. अलिकडेच मुकेश यांनी त्यांचा नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीए की हा तोच वसूली भाई आहे. फोटोत मुकेश यांचे केस वाढलेले आहेत. दाढीही पांढरी झाली आहे. फोटो पाहून एका चाहत्याने कमेन्ट केली, 'हे तुम्ही आहात, माझा यावर बसत नाहीए.' तर अजून एका युझरने लिहिलं, 'तुमचा लुक खूप बदला आहे.' मुकेश यांचा हा लुक काहींना आवडला तर काहींना अजिबातच आवडला नाही. पण मुकेश यांचे कट्टर चाहते हा लुक पाहून पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात पडले. दरम्यान, मुकेश यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. १९९८ मध्ये 'चायना गेट' या पहिल्याच सिनेमातील 'जगिरा' व्यक्तिरेखेने त्यांना प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर त्यांनी 'फर्ज', 'धुंद', 'जमीन', 'अफहरण', 'संडे', 'हल्ला बोल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल आहे. गोलमाल या चित्रपटामुळे तर त्यांच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/vPBaFZ0