Full Width(True/False)

Realme च्या ‘या’ पॉवरफुल फोन्सचा आज पहिला सेल, २१GB पर्यंत रॅम-४८MP कॅमेरा ; किंमत १३,५०० रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली : ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन आणि ला लाँच केले होते. या दोन्ही स्मार्टफोन्सचा आज पहिला सेल फ्लिपकार्टवर () सुरू होणार आहे. या फोन्सच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा, १२८ जीबीपर्यंत स्टोरेज आणि ५००० एमएएचची दमदार बॅटरी यासारखे फीचर्स दिले आहेत. कंपनीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ५जी पॉवर सेव्हिंग फीचर देखील दिले असून, जे आपोआप ४जी आणि ५जी मध्ये स्विच करते. पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स देखील मिळतील. Realme 9 5G आणि Realme 9 5G SE ची किंमत व ऑफर्स कंपनीने दोन्ही स्मार्टफोन्सला दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. Realme 9 5G च्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये, तर ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १७,४९९ रुपये आहे. तसेच, Realme 9 5G SE च्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २२,९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २२,९९९ रुपये आहे. कंपनी ICICI बँक आणि SBI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि ईएमआयवर इंस्टंट डिस्काउंट देत आहे. ९ ५जी वर १,५०० रुपये, तर एसई मॉडेलवर २,००० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे, एकूण सर्व ऑफर्सचा लाभ मिळाल्यास Realme 9 5G ला १३,५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. Realme 9 5G आणि Realme 9 5G SE चे स्पेसिफिकेशन्स Realme 9 5G स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसर आणि ११ जीबीपर्यंत रॅम वाढवण्याची सुविधा मिळते. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा रियर आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. तसेच, Realme 9 5G SE मध्ये ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १०८०x२४०० पिक्सल, रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर आणि १३ जीबीपर्यंत रॅम वाढवण्याची सुविधा दिली आहे. म्हणजेच ८ जीबी रॅमच्या या डिव्हाइसची रॅम तुम्ही २१ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल रियर आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तर ३० वॉट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RaUurzB