Full Width(True/False)

Realme च्या ‘या’ स्वस्तात मस्त स्मार्टफोनचा आज पहिला सेल, किंमत एवढी कमी की तुटतील विक्रीचे रेकॉर्ड्स

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वीच भारतात Narzo 50 स्मार्टफोनला लाँच केले आहे. हा कंपनीच्या बजेट रेंजचा भाग आहे. लाँचनंतर आज या स्मार्टफोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. स्मार्टफोनला पहिल्या सेलमध्ये ई-कॉमर्स वेबसाइट आणि Realme.com वरून खरेदी करता येईल. च्या प्रमुख फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये MediaTek Helio G९६ चिपसेट दिला आहे. तसेच, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.६ इंच डिस्प्ले, ३३ वॉट डार्ट चार्जिंगसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. Realme Narzo 50 स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Realme Narzo 50 ची किंमत आणि ऑफर्स Realme Narzo 50 स्मार्टफोनला दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. याचे बेस मॉडेल ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,४९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला तुम्ही स्पीड ब्लू आणि स्पीड ब्लॅक या रंगात खरेदी करू शकता. तसेच, HDFC बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. सोबतच, realme.com वरून खरेदी करताना पेटीएमवरून पेमेंट केल्यास १ हजार रुपये कॅशबॅक मिळेल. Realme Narzo 50 स्पेसिफिकेशन्स Realme Narzo 50 मध्ये ६.६ इंच HD+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४१२ पिक्सल आणि अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G९६ प्रोसेसरसह ४ जीबी/६जी रॅम मिळते. तसेच, स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सल मुख्य सेंसर, २ मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाइट पोर्ट्रेट कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह येतो. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wOQJURs