Full Width(True/False)

दादा कोंडकेंचं कसं झालं निधन, मृत्यूचं कोडं कधी सुटलंच नाही!

ज्येष्ठ मराठी अभिनेते-चित्रपट निर्माते दादा कोंडके यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेऊया. तो काळ स्वातंत्र्यपूर्व भारताचा होता. १९३२ चं वर्ष होतं. पुण्याजवळील इंगवली या छोट्याशा गावातील एक कुटुंब कामाच्या शोधात मुंबईत आले होते. मुंबईत, हे कुटुंब लालबागच्या चाळीत स्थायिक झाले, ज्यांचे बहुतेक कुटुंबिय बॉम्बे डाईंगच्या सूतगिरणीत काम करत होते. गोकुळाष्टमीच्या दिवशी मध्य मुंबईतील नायगाव येथे गिरणी कामगार कुटुंबात जन्मल्यामुळे दादांचे नाव कृष्ण ठेवण्यात आले. ते मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, जे सिनेमांतील द्विअर्थी संवादांसाठी प्रसिद्ध होते. मोठा भाऊ या नात्यांने सिनेसृष्टी आणि चाहते त्यांना दादा म्हणूनच हाक मारायचे. यामुळे त्यांनीही सिनेमांमध्ये त्यांचं नाव दादा कोंडकेच लावायला सुरुवात केली.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/REfeM4s