टेक्नोलॉजी वर्ल्ड मध्ये या आठवड्यात सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरची खरेदी केली आहे. मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर (जवळपास साडे तीन लाख कोटी रुपये) खर्च केले आहेत. मस्क हे ट्विटरचे मालक बनल्यानंतर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि मुख्य वित्तिय अधिकारी नेड सेगल या दोघांना तात्काळ कंपनीतून काढून टाकले आहे. या मोठ्या घटने सोबतच जगभरातील अनेक देशात जवळपास दोन तास पर्यंत व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाउन झाले होते. या दोन तासात यूजर्सला चॅट आणि चॅट ग्रुपमध्ये मेसेज पाठवणे ते स्टेट्स अपलोड करण्यात समस्या येत होती. तसेच या आठवड्यातील तिसरी सर्वात मोठी बातमी म्हणजे नवीन आयओएस अपडेट iOS 16.1 ला जारी करण्यात आले आहे. मागील आठवड्यात देशात व जगभरात टेक जगतात कोणत्या मोठ्या घडामोडी घडल्या आहेत, सविस्तर पणे जाणून घ्या.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6zVsh03