Top 5G Smartphones In India : सगळ्यांना माहित असल्याप्रमाणे 5G कनेक्टिव्हिटीमध्ये 4G पेक्षा सुमारे २० पट वेगाने इंटरनेट वापरता येते. देशात 5G सेवेचा शुभारंभ झाला असून दूरसंचार कंपनी Airtel आणि Reliance Jio नेही देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. यामुळेच अनेक 4G स्मार्टफोन युजर्स त्यांचे फोन अपग्रेड करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्ही तुमचा फोन 5G वर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. आज आम्ही तुम्हाला कमी किंमतीत मिळू शकणार्या पाच मोस्ट स्टायलिश 5G फोनबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लिस्टमध्ये Samsung Galaxy M13 5G, Poco M4 Pro 5G, Redmi Note 11 Pro Plus 5G, iQoo Z6 5G, लावा ब्लेझ 5G सारख्या जबरदस्त फोन्सचा समावेश आहे. जाणून घेऊया या फोन्सच्या फीचर्सबद्दल सविस्तर.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GUfM8I9