फ्लिपकार्टवर Year End Sale सेल सुरू आहे. २०२२ हे वर्ष संपण्याआधी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टकडून यावर्षातील शेवटचा सेल सुरू केला आहे. जर तुम्हाला या वर्षात नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर या सेलमध्ये तुम्हाला ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही एकदम स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवरील हा सेल २४ डिसेंबर पासून सुरू झाला आहे. ग्राहकांसाठी हा सेल ३१ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या सेल मध्ये स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. सेलमध्ये Blaupunkt TV, Redmi आणि VUgold सारख्या टीव्ही कंपन्यांच्या टीव्हीवर शानदार डील्स दिली जात आहे. स्वस्तात मोठ्या स्क्रीनचा टीव्ही खरेदी करण्याची ही या वर्षातील अखेरची संधी आहे, असं म्हणता येईल. जाणून घ्या कोणत्या स्मार्ट टीव्हीवर किती डिस्काउंट दिला जात आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ri4I3sj