WhatsApp Features 2022 : व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी कायमच नव-नवीन फीचर्स आणत असते. युजर्सची गोपनीयता अधिक सुरक्षित राहावी तसेच, त्यांचा प्लॅटफॉर्म वापरण्याचा अनुभव अधिक मजेशीर व्हावा हा नेहमी कंपनीचा प्रयत्न असतो. २०२२ हे वर्ष देखील WhatsApp युजर्ससाठी खूप रोमांचक ठरले. कारण , Messaging Platform WhatsApp ने या वर्षी बरीच गोपनीयता आणि मजेदार वैशिष्ट्ये सादर केली, ज्यांनी WhatsApp मेसेजिंग अनुभवाला एक वेगळा अनुभव दिला आहे. यामध्ये मेसेज युवरसेल्फ फीचर, अवतार फीचर, View Once मेसेजेससाठी स्क्रीनशॉट ब्लॉक करणे, WhatsApp Community Feature, लिव ग्रुप सायलेन्टली, इमोजी रिअॅक्शन, फाइल शेअरिंग सारख्या अनेक भन्नाट फीचर्सचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहो की, २०२२ मध्ये कोणत्या WhatsApp सुविधा सुरू करण्यात आल्या, ज्यांच्या मदतीने युजर्सना मेसेजेस करणे अधिक सोपे आणि सोयीचे झाले. जाणून घेऊया सविस्तर.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/s3bDO8H