Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Love Story: महाराष्ट्राचे लाडके कपल असणाऱ्या रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. त्याआधी जवळपास १० वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. २० वर्षांपासून एकमेकांसोबत असणाऱ्या जोडीचं नातं आजही नव्यासारखंच आहे. हल्लीच 'वेड' या मराठी सिनेमात त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. या दोघांचे कौंटुबिक पार्श्वभूमी आणि धर्म यामध्ये मोठा फरक होता. रितेश महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्यातील, तर जिनिलियाचे कुटुंब लाइमलाइटपासून दूर होते. रितेश हिंदू मराठी कुटुंबातील तर जिनिलिया ख्रिश्चन. एवढी तफावत असूनही ते सिनेमाच्या सेटवर ते प्रेमात पडले आणि आयुष्यभरासाठी त्यांचे सूत जुळले. त्यांचे चाहते प्रेमाने त्यांना 'भाऊ-वहिनी' म्हणून संबोधतात. आज व्हॅलेंटाइन डे दिवशी जाणून घेऊया रितेश-जिनिलियाची फिल्मी लव्ह स्टोरी...
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/jPthcwb