Full Width(True/False)

मराठी माध्यमातच मुलांना शिकवण्याचा निर्णय का घेतला? चिन्मयी सुमीतच्या उत्तराने जिंकलं मन

सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'कोण होणार करोडपती'मध्ये स्पर्धकांशिवाय काही सेलिब्रिटीही सहभागी होतात. अलीकडेच या कार्यक्रमात अभिनेता सुमीत राघवन आणि त्याची पत्नी अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी हजेरी लावली होती. ही जोडी पहिल्यांदाच या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. त्यांनी यामध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभवांबद्दल सांगितले. मराठी नाटकामुळे सुमीत आणि चिन्मयी यांची पहिली भेट कशी आणि कुठे झाली, त्यांच्या मुलांनी मराठी शाळेतच शिक्षण का केले या विषयांवर भाष्य केले. याशिवायही त्यांनी विविध अनुभव सांगितले. सचिन खेडेकर यांनी चिन्मयी आणि सुमीत यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या, या जोडीने त्यांच्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/emhAciP