Full Width(True/False)

जिओचे जबरदस्त प्लान, 740GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग

रिलायन्स जिओ कडून युजर्संसाठी अनेक प्रीपेड प्लान ऑफर केले जात आहेत. त्यामुळे कोणता प्लान घ्यावा या संदर्भात युजर्सं गोंधळून जातात. टेलिकॉम ऑपरेटरकडून वेगवेगळ्या प्राइस सेगमेंटमध्ये वेगळ्या बेनिफिट्सचे रिचार्ज प्लान मिळतात. याची किंमत १४९ रुपयांपासून ४९९९ रुपयांपर्यंत आहे. जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि तुम्हाला सुद्धा कोणत्या प्लानचा रिचार्ज करावा हे लवकर सूचत नसेल तर आम्ही तुम्हाला या संदर्भात खास माहिती देत आहोत. खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ने अल्पावधीत आपले बेस युजर्सं अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूप पुढे नेले आहेत. जिओ लागोपाठ आपल्या युजर्संसाठी अनेक नवीन-नवीन प्लान आणत असते. रिलायन्स जिओचे २०० रुपयांपेक्षा कमी बजेटमधी बेस्ट प्लान पासून ते थेट ३ हजार रुपयांपर्यंतचे बेस्ट प्लानचा यात समावेश आहे.

जिओकूडन सर्वात स्वस्त प्लान १४९ रुपयांचा प्लान आहे. यात युजर्संना १ जीबी डेली डेटा २४ दिवसांसाठी दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड जिओ ते जिओ कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ३०० FUP मिनट मिळते. दररोज १०० फ्री एसएमएस शिवाय, या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर तुम्ही १९९ रुपयांचा प्लान रिचार्ज करू शकता. यात २८ दिवसांची वैधता मिळत असून दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि नॉन जिओ नंबरवर कॉलिंगसाठी १ हजार FUP मिनिट्स मिळतात.

जिओ कंपनीचा ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा ऑफर करते. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग शिवाय अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २००० FUP मिनिट मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात तसेच युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जातात. जिओचा हा प्लान चांगला आहे. यात रोज १.५ जीबी म्हणजेच पुरेसा डेटा आणि कॉलिंग फ्री अशी सुविधा मिळते.

जर तुम्हाला हेवी डेटा हवा असेल तर तुम्हाला या रेंजमध्ये ४४४ रुपयांचा प्लान रिचार्ज करणे भाग आहे. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जातात. या प्रीपेड प्लानमध्ये युजर्संना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २००० FUP मिनट मिळतात. यात जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा युजर्संना मिळते.

जर तुमचे बजेट ६०० रुपये असेल तर तुम्ही ५९९ रुपयांचा रिचार्ज करु शकता. हे रिचार्ज जबरदस्त बोनिफिट्स मिळवून देऊ शकतात. या प्लानमध्ये युजर्संना रोज २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस मिळतात. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग सोबत अन्य नेटवर्क्सवर कॉलिंग करण्यासाठी या प्लानमध्ये 3000 FUP मिनिट मिळतात. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा ऑफर केले जाते. या प्लानची वैधता ८४ दिवस इतकी आहे.

जर तुम्हाला ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान रिचार्ज करायचा असेल तर तुम्हाला या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळू शकतो. तसेच या प्लानमध्ये १०० फ्री एसएमएस रोज दिले जातात. या प्लानमध्ये युजर्संना जिओ टू जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्क्सवर कॉलिंग करण्यासाठी 3000 FUP मिनिट मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जातात. या प्लानची वैधता ८४ दिवस इतकी आहे.

जर तुमची जास्त पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही २५९९ रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लान रिचार्ज करु शकता. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना रोज २ जीबी डेटा प्लस १० जीबी डेटा संपूर्ण वैधता पिरियडसाठी मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंग साठी १२,००० FUP मिनट मिळतात. या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जातात.



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Auybwe