मुंबई: बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या यानं रविवारी दुपारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येनं केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर देशही हळहळला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याच्या आत्महत्येच्या कारणांवरून सुरू झालेली चर्चा थांबताना दिसत नाही. सुशांतसिंह राजपूत याला आत्महत्येला भाग पाडण्यात आलं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तर, तो सिनेसृष्टीतील राजकारणाचा आणि घराणेशाहीचा बळी ठरला आहे. त्याचा खून झाला आहे, असा आरोप काहींनी केला आहे. त्यामुळं त्याच्या आत्महत्येचं गूढ वाढलं आहे. याचाच संदर्भ घेत आता , यांच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिहारमध्ये पेशानं वकिल असलेल्या सुधीर कुमार ओझा यांनी मुझफरपूर येथील पोलिसा ठाण्यात आता सलमान खान, करण जोहर यांच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘या तक्रारीमध्ये सुशांतसिंह राजपूत याच्याकडून तब्बत चित्रपट काढून घेण्यात आले आणि काही चित्रपट तर त्याचे प्रदर्शितच झाले नाहीत. या गोष्टींमुळं ओढावलेल्या तणावामुळं टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं', असं म्हटलं गेलं आहे. सुधीर यांनी सलमान खान, करण जोहर, संजय लीला भंसाली, आणि बॉलिवूडमधील इतर लोकांचा समावेश आहे. एकता कपूरनं यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय.'मी स्वतःच सुशांतला माझ्या मालिकेतून लॉन्च केलं होतं, असं असताना माझ्या विरोधात अशाप्रकारची तक्रार दाखल केल्याबद्दल धन्यवाद. या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे. जे सत्य आहे ते लवकरच समोर येईल', असं एकतानं म्हटलं आहे. दरम्यान, सुशांतनं आत्महत्येचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात पोलिस आता तपास करणार आहेत. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? याची चौकशी केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून यात त्यांचा मृत्यू गळफास लागल्यानं झाला असल्याचं स्पष्ट झालंय. तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होता असंही त्या अहवालात म्हटलं आहे. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धा हेच याचे कारण आहे? का याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hA6DWT