Full Width(True/False)

शाओमीच्या या फोनमध्ये वेगळाच प्रॉब्लेम येतोय, वाय-फाय देतोय धोका

नवी दिल्लीः शाओमीकडून ला रिब्रँडेड Redmi Note 9 Pro इंडियन व्हर्जन म्हणून लाँच केले होते. हा बजेट स्मार्टफोन सध्याच्या प्राईस सेगमेंटमध्ये पॉप्युलर आहे. नोट सीरिजची प्रसिद्धी कायम ठेवली आहे. परंतु, या स्मार्टफोनच्या वाय फाय संबंधित एक समस्या आता अनेक युजर्संना जाणवू लागली आहे. युजर्संनी या समस्येची तक्रार कंपनीकडे केली आहे. वाचाः अनेक Redmi Note 9S युजर्संनी एका वायफाय बग संदर्भात Mi कम्युनिटी आणि XDA फोरम मध्ये लिहिलेय, युजर्संच्या माहितीनुसार, फोन स्क्रीन लॉक करण्यासाठी जवळपास १० ते १५ मिनिट नंतर वाफफाय आपोआप डिसकनेक्ट होत आहे. तसेच स्मार्टफोन अनलॉक केल्यानंतर डेटा ट्रान्समिशन सुरू होत नाही. तसेच वाय फाय कनेक्ट होत नाही. ही अडचण आली समोर फोन लॉक केल्यानंतर काही मिनिटांनंतर वाय फाय डिस्कनेक्ट होतो. त्यानंतर कनेक्ट होत नाही. सध्या ही अडचण केवळ डिव्हाईसच्या युरोपियन व्हेरियंटमध्ये येत आहे. इंडियन युजर्संकडून अद्याप अशी कोणतीही समस्या आली असल्याचे कुठेही म्हटले नाही. काही युजर्संनी दावा केला आहे की, लेटेस्ट अपडेट या बगला फिक्स करतो. वाचाः परफेक्ट सोल्यूशन नाही Android Authority च्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट MIUI 11.0.8.0 ग्लोबल स्टेबल बिल्डने अपडेट केल्यानंतर बग पूर्णपणे नाही. पण आधी पेक्षा ठीक होतो. त्यानंतर फोन प्रत्येक १० मिनिटाला नेटवर्कने डिस्कनेक्ट होतो. युजर्संना पुन्हा लॉग इन करावा लागतो. त्यामुळे या अडचणीचे परफेक्ट सोल्यूशन अद्याप समोर आले नाही. वाचाः अपडेटने होईल फिक्स सर्व अँड्रॉयड डिव्हाईसेस काही तासांसाठी वाय फाय नेटवर्कने रिकनेक्ट करता येते. तसेच आयपी अॅड्रेस रिन्यू करता येते. हीच प्रकिया Redmi Note 9S काही मिनिटांनंतर वारंवार येत आहे. शाओमीकडून या प्रॉब्लेमला फिक्स करण्यासाठी लवकरच एखादा OTA अपडेट यूजर्स दिले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2C3Wr8C