Full Width(True/False)

१९ रुपये, ३० दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉल

नवी दिल्लीः बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी लागोपाठ नवीन प्लान लाँच करीत आहे. कंपनीने नुकतेच 100Mbps स्पीड सोबत १.४ टीबी डेटाचा प्लान लाँच केला आहे. परंतु, व्हाईस ओन्ली एसटीव्ही कंपनीकडे ५ व्हाईस ओन्ली एसटीव्ही आहेत. ज्याची सुरुवात १९ रुपयापासून सुरू होते. हे प्लान अनलिमिटेड कॉलिंगसोबत येतात. तामिळनाडू सर्कलमध्ये ऑफर केले जात असलेल्या स्पेशल टॅरिफ व्हाऊचर्स (STV) संबंधी जाणून घ्या... वाचाः १९ रुपयाचा बीएसएनएल व्हाईस ओन्ली STV बीएसएनएलचा व्हाईस ओन्ली कॅटगरी अंतर्गत हा स्वस्त टॅरिफ व्हाऊचर आहे. या व्हॉऊचरची किंमत १९ रुपये आहे. या व्हाऊचरमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देते. कॉल्स पूर्णपणे फ्री नाही. यासाठी तुम्हाला २० पैसे प्रति मिनिट या हिशोबाप्रमाणे कॉलसाठी पैसे मोजावे लागतात. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकतात. या व्हाऊचरची वैधता ३० दिवस इतकी आहे. ९९ रुपयांचा बीएसएनएलचा व्हॉईस ओन्ली STV बीएसएनएलचा ९९ रुपयांचा व्हॉऊचर सुद्धा अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देतो. या व्हाऊचरमध्ये २५० मिनिट प्रतिदिन लिमिट आहे. प्रत्येक कॉलनंतर ग्राहकांना टॅरिफ या हिशोबाप्रमाणे पैसे मोजावे लागतील. तसेच प्रीमियम नंबर आणि इंटरनॅशनल नंबरवर कॉल साठी चार्ज द्यावा लागतो. या व्हाऊचरची वैधता २२ दिवसांची आहे. वाचाः १३५ रुपयांचा बीएसएनएल व्हॉईस ओन्ली STV बीएसएनएलचा १३५ रुपयांचा तिसरा व्हॉऊचर आहे. ज्यात दर दिवशी ३०० मिनिटांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग मिळते. ३०० मिनिट खर्च झाल्यानंतर कॉलिंगसाठी बेस टॅरिफ लागतो. या व्हॉऊचरची वैधता २४ दिवसांची आहे. २०९ रुपयांचा व्हॉईस ओन्ली STV २०९ रुपयांच्या बीएसएनएलचा एसटीव्ही वैधता ९० दिवस आहे. हा व्हॉऊचर अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देतो. हा रिचार्ज केल्यानंतर अकाउंटमध्ये २५ रुपयांचा टॉकटाईम मिळतो. कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २ सेकंदासाठी १ पैसा चार्ज लागतो. ३१९ रुपयांचा बीएसएनएल व्हॉईस ओन्ली STV चा हा सर्वात महाग बीएसएनएल व्हॉईस ओन्ली STV आहे. ३१९ रुपयांच्या या एसटीव्हीत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट मिळतात. याची वैधता ७५ दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2AqJkhz