पटणा- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून त्याचे घरचे अजून सावरले नाहीत. सुशांतच्या वडिलांना दिलासा देण्यासाठी अनेक नेते आणि स्टार मंडळींनी त्यांची भेट घेतली. रविवारी ज्येष्ठ अभिनेते यांनीही सुशांतच्या वडिलांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. नाना यांनी कुटुंबासोबत घालवला वेळ नाना पाटेकर दोन दिवसांसाठी मोकामा, बिहार येथील सीआरपीएफ ट्रेनिंग सेन्टरमध्ये गेले होते. यानंतर ते पटणातील राजीव नगर येथील सुशांतसिंह राजपूतच्या घरी गेले आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. सुशांतचं शनिवारी १३ वं होतं. नेते आणि कलाकार मंडळी जात आहेत सुशांतच्या घरी- सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर अनेक भोजपूरी गायक आणि अभिनेते मनोज तिवारी, खेसारी लाल यादव, अक्षरा सिंह यांनीही राजपूत कुटुंबियांची भेट घेतली. याशिवाय बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि आरजेडीचे नेता तेसज्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांनीही सुशांतच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. भावुक दिसले नाना पाटेकर या दुःखाच्या क्षणी सुशांतच्या घरच्यांकडे आपली संवेदना व्यक्त करताना नानाही फार भावुक झाले होते. नाना यांनी सुशांतच्या अभिनयाचं कौतुक केलं. यासोबतच ते बराच वेळ सुशांतच्या वडिलांशी बोलत होते. यावेळी दोघांचेही चेहरे फार उदास होते. मीडियाशी साधला नाही संवाद- सुशांतच्या घरच्यांना भेटून झाल्यानंतर नाना सरळ विमानतळाकडे रवाना झाले. यादरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला नाही. मोकाट येथील सीआरपीएफ जवानांच्या ट्रेनिंग सेन्टरला त्यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती करण्याकडे भर द्यावा असं आवाहनंही केलं. 'सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन' दिवंगत अभिनेता याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचे सोशल मीडीया अकाउंट सुरू ठेवण्याचे तसेच त्याचे पाटण्यातील घर स्मारकामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. याशिवाय सिनेमा, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन' (एसएसआरएफ) स्थापन करण्याचेही राजपूत परिवारने जाहीर केले आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी अत्यंत भावनात्मक असे जाहीर निवेदन केले आहे. 'तो आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि प्रेरणा होता. त्याच्या अकस्मात आणि अकाली निधनाने आमच्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खात आमची साथ देणाऱ्या सुशांतच्या प्रत्येक चाहत्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दांत त्यांनी सुशांतच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31qoeuv