व्होडाफोनच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी डबल डेटा ऑफर करते. या प्लानमध्ये रोज २ जीबी प्लस २ जीबी म्हणजेच एकूण ४ जीबी डेटा युजर्संना मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना डेली १०० फ्री एसएमएस दिला जातो. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या प्लानमध्ये सब्सक्रायबर्सला व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे सब्सक्रिप्शन दिले जाते.
व्होडाफोनचा आणखी एक प्ला आहे. या प्लानची किंमत ४४९ रुपये आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी प्लस २ जीबी डेटा युजर्संना मिळतो. या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्सवर एक नजर टाकल्यास यात देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिला जाते. या प्लानमध्ये युजर्संना रोज १०० एसएमएस दिले जातात. तसेच या प्लानमध्ये सब्सक्रायबर्सला व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. या प्लानची वैधता ही ५६ दिवसांची आहे.
खासगी कंपनी रिलायन्स जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १००० मिनिट्स मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. तसेच या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस ऑफर केले जातात. जिओचा मिड रेंजमधील प्लान आहे.
जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा सोबत ६ जीबी एक्स्ट्रा डेटा ऑफर केला जातो. या हिशोबा प्रमाणे एकूण ९० जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. दररोज १०० फ्री एसएमएस सोबत या प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी फ्री कॉलिंग आणि नॉन जिओ नेटवर्क्ससाठी १००० मिनिट्स युजर्संना दिले जातात. जिओच्या या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जातात. रोज ३ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लानमध्ये जिओचा हा आणखी एक बेस्ट प्लान आहे.
एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा मिळेल. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर ट्रू अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस ऑफर केले जाते. या प्लानमध्ये तुम्हाला एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम, झी ५ आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. तसेच या प्लानमध्ये सब्सक्रायबर्संना FASTag खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. जास्त डेटा हवा असेल तर हा प्लान सुद्धा बेस्ट आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fpO99F