नवी दिल्लीः आपल्या सर्वसामान्य युजर्ससोबत जिओ फोन युजर्संसाठीही अनेक जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. आज आम्ही तुम्हाला जिओ फोनचे ऑल इन वन () संबंधी माहिती देत आहोत. या प्लानची सुरुवात ७५ रुपयांपासून सुरू होते. तरे १८५ रुपयांपर्यंत आहे. युजर्संना यात ५६ जीबी पर्यंत डेटा मिळतो. तसेच फ्री कॉलिंग आणि अन्य सुविधा मिळते. वाचाः ७५ रुपयांचा JioPhone प्लान हा सर्वात स्वस्त ऑल इन वन प्लान आहे. २८ दिवसांच्या वैधता असलेल्या या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ५०० नॉन जिओ मिनिट्स मिळतात.तसेच ५० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये दिले जाते. वाचाः १२५ रुपयांचा JioPhone प्लान १२५ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. यात जिओ फोन युजर्संना रोज ५०० एमबी डेटा दिला जातो. युजर्संना एकूण १४ जीबी डेटा दिला जातो. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ५०० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच ३०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः १५५ रुपयांचा JioPhone प्लान २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये एकूण २८ जीबी डेटा दिला जातो. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ५०० नॉन जिओ मिनिट्स दिले जातात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः १८५ रुपयांचा JioPhone प्लान बाकीच्या तिन्ही प्लानप्रमाणे १८५ रुपयांच्या प्लानमध्येही २८ दिवसांची वैधता मिळते. यात जिओ फोन युजर्संना रोज २ जीबी डेटा मिळतो. युजर्संना एकूण ५६ जीबी डेटा दिला जातो. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ५०० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38DEbiK