Full Width(True/False)

दिग्दर्शक राजमौलींना करोनानं गाठले; कुटुंबालाही लागण

मुंबईः बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना करोनाची लागण झाल्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही करोनानं शिरकाव केला आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक यांना देखील करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला करोनानं गाठलं आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. () काही दिवसांपासून मला व माझ्या कुटुंबियांना ताप येत होता. डॉक्टरांकडून औषधोपचार केल्यानंतर ताप उतरला होता. मात्र, तरीही आम्ही करोनाची चाचणी केली. चाचणी केल्यानंतर करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरातच सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. आमच्या कुटुंबातील कोणालाच करोनाची लक्षण नाहीत, पण सरकारच्या नियमांनुसार आम्ही खबरदारी घेत आहोत. असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच, राजमौली यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णयही घेतला आहे. करोनामुक्त झाल्यानंतर आम्ही प्लाझ्मा दान करणार आहोत, जेणेकरून इतर करोनाग्रस्तांना त्यांचा उपयोग होईल, असंही ते म्हणाले. वाचाः राजमौली हे त्यांची पत्नी रामा राजामौला आणि मुलगी एसएस मयूखासोबत हैदराबाद येथे राहतात. दरम्यान, ब्लॉकब्लास्टर चित्रपट बाहुबलीमुळं त्याचं नाव बॉलिवूड मनोरंजन सृष्टीत प्रकाशझोतात आलं. सध्या ते आरआरआर या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. पहिले हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र, लॉकडाऊनमुळं या चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली असून आता जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30TcAXm