Full Width(True/False)

बर्थडे साजरा करावा तर सोनू सूदसारखाच

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आज ३० जुलै रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. लॉकडाउनमधील इतर दिवसांप्रमाणेच या दिवसांमध्येही तो गरजू लोकांची मदत करत आहे. कोविड-१९ महामारीमध्ये सोनूचं एक वेगळं रूप सर्वांना पाहायला मिळालं. हजारो लोकांच्या आयुष्यात देवासारखा तो धावून आला आणि त्यांना मदत केली. आता वाढदिवसा दिवशीही सोनू देशभरात मोफत मेडिकल कॅम्प लावत आहे. त्याच्या या मोहिमेत जवळपास ५० हजार लोक जोडले जातील अशी तो आशा व्यक्त करत आहे. वेगवेगळ्या राज्यांतील डॉक्टरांच्या संपर्कात सोनू रिपोर्टनुसार, या मोहीमेसाठी त्याने ग्रामपंचायतीतील सरपंचांशीही संपर्क साधला. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मोफत मेडिकल चेकअप सुविधेचा फायदा नागरिकांना मिळेल. पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशा येथील अनेक राज्यांतील डॉक्टरांशी सोनूने यासंबंधी चर्चा केली. इंजीनिअर मुलीची केली मदत काही दिवसांपूर्वी एका ट्विटर यूझरने सोनूकडे मदत मागितली होती. शारदा नावाची एक मुलगी इंजीनिअर होती. लॉकडाउनमध्ये तिची नोकरी गेली. यानंतर तिच्या कुटुंबियांवर भाज्या विकायची वेळ आली. या ट्वीटला उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'माझे अधिकारी तिच्याकडे गेले, तिची मुलाखत झाली आणि तिला जॉब लेटरही मिळालं.. जय हिंद.' दरम्यान, लॉकडाउनच्या काळामध्ये मरण पावलेल्या तसंच जखमी झालेल्या श्रमिकांच्या कुटुंबांना तो आर्थिक आधार देणार आहे. त्यासाठी त्यानं उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. जीव गमावलेल्या स्थलांतरितांचे संबंधित पत्ते आणि बँक तपशील या गोष्टींची माहिती त्यानं अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. करोनामुळे सुरू झालेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे हजारो श्रमिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. प्रवासासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्यानं अनेक जण पायीच आपल्या गावी जाण्यास निघाले. त्यापैकी काहींना वाटेत मृत्यूनं गाठलं. तर काही जण अपघातांत जखमीही झाले. अशा मृत आणि जखमी झालेल्या कामगारांच्या चारशे कुटुंबांना आर्थिक मदत करणार असल्याचं सोनू सूदनं नुकतचं सांगितलं आहे. 'मृत किंवा जखमी झालेल्या श्रमिकांच्या कुटुंबियांचं सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी मदत करण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यांना आधार देणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे असं मला वाटतं,' असं सोनूनं एका निवेदनात म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी परतणाऱ्या श्रमिकांच्या पाठीशी सोनू ठामपणे उभा राहिला होता. त्यानं अशा हजारो श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती. या व्यवस्थेमुळे हजारो श्रमिकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचणं शक्य झालं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PbsDKs