नवी दिल्लीः Platforms ने ३० जून २०२० रोजी झालेल्या तिमाहीत जवळपास १ कोटी नवीन ग्राहक जोडले आहेत. या सोबतच कंपनीचे एकूण सब्सक्रायबर्सची संख्या आता ३९.८ कोटीवर पोहोचली आहे. जिओने आपल्या तिमाहीचा डेटा रिलीज केला आहे. ज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत १८२.८ टक्के नेट प्रॉफिटची वाढ झाली आहे. करोना व्हायरस असूनही कंपनीने सर्विस प्रोव्हाईडर मोठ्या संख्येत नवीन युजर्स आणि इयर ऑन इयर वाढ करण्यात कंपनी यशस्वी राहिली आहे. कंपनीने Jio POS-Lite अॅप याच दरम्यान लाँच केला आहे. वाचाः 2020-2021 च्या पहिल्या तिमाहीचा परफॉर्मन्स रिपोर्टमद्ये रिलायन्स जिओने आकडा वाढवला आहे. ने या तिमाहीत ९९ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. जानेवारी - मार्च २०२० च्या तिमाहित च्या तुलनेत हे ग्राहक कमी आहेत. कारण, जानेवारी - मार्च तिमाहित कंपनीने १.७५ कोटी नवीन ग्राहक बनवले होते. वाचाः जिओने Jio POS-Lite अॅप लाँच केला असून आपला युजर बेस वाढवला आहे. हे अॅप एप्रिलमध्ये लाँच करण्यात आले होते. या अॅपवरून युजर्स दुसऱ्या नंबरवर रिचार्ज केल्यास ४.१६ टक्के कमिशन मिळवू शकतात. या शिवाय कंपनीने लॉकडाऊनमध्ये आपल्या सर्व युजर्संना इनकमिंग कॉल वैधता वाढवली होती. जिओने नुकतेच मेड इन इंडिया ५जी सोल्यूशन घेऊन येण्याची घोषणा केली आहे. ५ जी स्पेक्ट्रमला भारतात उपलब्ध करण्यात आल्यानंतर याची चाचणी सुरू केली जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hUCzok