Full Width(True/False)

यांना लाज वाटायला पाहिजे; दूध आंदोलकांवर भडकली अभिनेत्री

मुंबई: खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं. काल कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतलं गेलं. अशा प्रकारच्या आंदोलनाचा अनेक जणांनी निषेध केला असून अन्नाची नासाडी करून आदोंलन करणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. आता सिनेसृष्टीतल्या एका अभिनेत्रीनं देखील दुधाची नासाडी केल्यानं संताप व्यक्त केला आहे. राज्यात झालेल्या दून आंदोलनावर अभिनेत्री अभिनेत्री हिनं सडकून टीका केली आहे. दुधाची नासाडी करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, असं तिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रस्त्यावर दुधाचे टॅंकर रिकामे केले गेले. दूध भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात दगडाला दुग्धाभिषेक करण्यात येत आहे. पाषाण हृदयी सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं गेलं. या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी राग व्यक्त केला. आकांक्षानं देखील हे पाहून आंदोलकांवर निशाणा साधला आहे. 'हे सर्व पाहून माझं रक्त खवळतंय. दूधाची नासाडी होतेय. आंदोलनाच्या नावाखाली दूधाची अशी नासाडी करणाऱ्या आंदोलकांना लाज वाटायला हवी. अनेक लोकांचा अन्नाशिवाय जीव जातोय आणि यांना दूध रस्त्यावर ओतायचं सुचतंय, ही माणसं मुर्ख आहेत.' असं ट्विट करत आकांक्षानं टीका केली आहे. दुध भावासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. राज्यभर दगडाला दुग्धाभिषेक करण्यात येत आहे. राज्यात दूध दराचा प्रश्न पेटला असून शेतकरी संघटनांनी १ ऑगस्टला बंद पुकारला आहे. त्याचा इशारा म्हणून काल राज्यभर दूध दर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, संकटाचा मोठा फटका शेती आणि पूरक उद्योगधंद्यांनाही बसतो आहे. दूध खरेदीच्या दरात कपात झाल्याने, विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या. करोनामुळे बाजारपेठा ठप्प, हॉटेल, दुकाने, बेकरी आणि दुधापासून बनवले जाणारे पदार्थ यांची निर्मिती, विक्रीही थांबली. आइस्क्रीम, मिठाई, दूधपावडर, लोणी, तुपाचे उत्पादन बंद झाले. कमाईचे मार्ग रोखल्यानं ग्राहकाच्या खिशालाही कात्री. या सर्वांचा एकत्रित परिणाम दुधाच्या मागणीवर झाला. राज्यात दररोज सुमारे ५२ लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. दूध विक्रीत चाळीस टक्क्यांहून अधिक घट झाली. उत्पादकाला प्रतिलिटर सोळा ते अठरा रुपयेच मिळत आहेत (त्याला विक्री दर ३२ ते ३५ रुपयांपर्यंत मिळत होता). देशात एक लाख टन दूध पावडर पडून असताना, केंद्राने दहा हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला. याची झळही दूध धंद्याला बसते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32HPwgB