नवी दिल्लीः शाओमीच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे. चीनची फोन निर्माता कंपनी Xiaomi सोमवारी २७ जुलै रोजी ५ मोठ्या घोषणा करणार आहे. शाओमी इंडियाचे एमडी मनु कुमार जैन यांनी याची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. दरम्यान, आपल्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले नाही की, या पाच घोषणा कोणत्या आहेत. शाओमी चाहत्यांनी याचा अंदाज स्वतः लावावा असे त्यांनी म्हटले आहे. वाचाः मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, एक किंवा दोन नाही. तर एकदम पाच #NoteWorthy अनाउंसमेंट येत आहे. रियलमी इंडिया टीमने मला आता सांगितले आहे की, सोमवारी एमआय चाहत्यांसाठी मेगा अनाउंसमेंटची तयारी करीत आहे. आपले कॅलेंडर मार्क करुन ठेवा. २७ जुलै रोजी PRIMETASTIC होणार आहे. मनु जैन यांनी अखेर आपल्या चाहत्यांना विचारले Any guesses? (काही अंदाज आहे?) वाचाः काय असू शकते लाँचिंग या ट्विटला रिप्लाय देताना अनेक चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. २७ जुलै रोजी काय लाँच होऊ शकते. एका चाहत्याने लिहिले आहे की, 1.mi watch, 2.mi band, 3.k30 ,4.Mi tv 5 आणि 5.prime ची घोषणा केली जावू शकते. तर एका चाहत्याने लिहिले आहे की, रेडमीची घोषणा आहे. म्हणून Mi Band च्या जागी कंपनी रेडमी बँड घेऊन येवू शकते. वाचाः शाओमीने आपल्या 2 ची किंमत भारतात कमी केली आहे. मे मध्ये लाँच करण्यात आलेल्या या इयरबड्सची किंमत ४४९९ रुपये ठेवण्यात आली होती. याची किंमत ५०० रुपये कमी करुन ती आता ३९९९ रुपये करण्यात आली आहे. हे इयरबड्स एकदा चार्ज होऊन ४ तासांपर्यंत चालू शकते. चार्जिंग मध्ये याला १४ तास चालवू शकते. यात आणखी एक सेन्सर देण्यात आल आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OVn56R