Full Width(True/False)

माझ्या आयुष्यातला 'जीवनावश्यक'; बर्थ डे बॉय कुशलसाठी श्रेयानं लिहिली भन्नाट पोस्ट

मुंबई: नाव घेतलं तरी सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येतं असं सिनेसृष्टीतलं एक नाव म्हणजे अभिनेता . कुशलचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्याला अनेक सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण यासर्वांमध्ये त्याची सहकलाकार आणि आणि मैत्रिण अभिनेत्री हिनं लिहिलेली पोस्ट खास आहे. श्रेयानं भन्नाट आणि तितकीच भावुक अशी पोस्ट शेअर करत कुशलला वाढदिवासच्या शुभेच्छा दिल्या आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमानिमित्त दोघां अनेक वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. त्यामुळं त्यांची मैत्री देखील तितकीच घट्ट झाली असून या पोस्टमधून श्रेयानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'आजकाल दुसऱ्यांसाठी जीव पाखडणारे लोक खूप कमी भेटतात. माझं नशीब थोरच म्हणायचं की माझी अशा एका अवलियाशी आठ वर्षापूर्वी मैत्री झाली . गेल्या आठ वर्षात आम्ही खूप काही शेअर केलं , सुख दुःख आणि हो immigration form भरायला लागणाऱ्या पेनापासून ते परदेशात मी केलेल्या शॉपिंग बॅग्सच्या वजनापर्यंत . कारण खूप प्रवास केला आम्ही एकत्र आणि आमच्या मैत्रीने पण....हा माणूस काय आहे हे कदाचीत त्यालाही माहित नाही ..मी मात्र जीवतोडून एखाद्यावर प्रेम कसं करावं हे त्याच्याकडून शिकलेय आणि आयुष्य कसं जगावं हेही....ह्या लॉकडाऊनमध्ये एक शब्द आपण सरखा वापरतोय ... 'जीवनावश्यक’माझ्या आयुष्यातला 'जीवनावश्यक' हॅपी बर्थडे'अशी भन्नाट पोस्ट श्रेयानं शेअर केली आहे. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विनोदवीर कुशल बद्रिकेने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रचंड मोठा असा चाहतावर्ग देखील आहे. चाहत्यांना तो आपलासा असा वाटतो. त्याच्या या अभिनयाबद्दल चाहते भरभरून बोलतात. कुशलाचा आजपर्यंतचा हा प्रवास सहज सोपा मुळीच नव्हता. मात्र यासाठी त्याला बराच स्ट्रगल करावा लागला. कुशल, सुनैना आणि त्यांचा मुलगा असं त्यांचं छोटं कुटुंब आहे. कुशलसाठी त्याचं कुटुंब हेच जग असून त्यांच्यातच तो सुख शोधतो. काही दिवसांपूर्वी त्यानं लिहिली भावुक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. 'लहानपणी प्रगतीपुस्तकाच्या लाल शेराने नालायक ठरलेला मी, दिसायला काळा बेंद्रा, येडा गबाळा बर्‍याचदा, बर्‍याच जणांना नकोसा झालेला मी, दिवसभराचे सगळे अपमान, मार, दु:ख घेऊन तुझी कुस भिजवून टाकणारा मी. आई तू ध्रुवताऱ्याची गोष्ट सांगायचीस ना तेव्हा ध्रुवतारा व्हावंसं वाटायचं, वाटायचं सालं आपल्यापर्यंत कुणी पोहचूच नये, तू माझ्यासाठी रोज गाणं गायचीस 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे…. तू म्हणायचीस ना तस्संच झालं, त्या कुरूप वेड्या पिल्लाचा राजहंस झाला आई. माझ्या इवल्याश्या बोटांना धरून, माझ्या लटपटत्या पायांना तू चालायला शिकवलंस, आज तुझा हात धरून, तुझ्या लटपटत्या पायाने तुला स्टेजवर आणताना अख्खं आयुष्य डोळ्यासमोरून धावत गेलं. तुझ्यापोटी जन्म घेतल्याचं आज सार्थक झालं, अशा शब्दांत कुशलनं त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2E3vnaR