Full Width(True/False)

करण जोहर म्हणाला, कंगनाला चण्याच्या झाडावर चढवू नका

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे अनेक धक्कादायक खुलासे केले की ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तिने फक्त घराणेशाहीविरोधातच आवाज उठवला नाही तर बॉलिवूडमधील माफियांवरही निर्भिडपणे बोलली. आदित्य चोप्रापासून करण जोहरपर्यंत कंगनाने सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अनेक मोठे खुलासे केले. एकीकडे अभिनेत्रीच्या प्रतिक्रियांवर बोललं जात आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर करण जोहरचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. कंगनावर काढला सर्व राग करण या व्हिडिओमध्ये कंगनाच्या नावानेच त्याला किती त्रास होतो हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. यात तो म्हणतो की, 'कंगना प्रत्येकवेळी वुमन कार्ड आणि विक्टिम कार्ड वापरू शकत नाही. आता खूप झालं. जर तुला सिनेसृष्टीत घाबरवलं जातंय तर तू सोडून दे सिनेसृष्टी. तुला कोणीही अडवलेलं नाही.' या मुलाखतीत तो पुढे म्हणतो की, लोकांनी कंगनाला चण्याच्या झाडावर चढवलं तर हेच होणार ना.. कंगनाने करणवर केले होते थेट आरोप कंगनाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, करण सुशांतला एक फ्लॉप अभिनेता समजायचा. उलट सुशांतच्या ज्या सिनेमाची करणने निर्मिती केली होती तो सिनेमा एग्झिब्यूटर्सला पसंत पडला नाही. अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला. कंगनाला मिळालं लोकांचं समर्थन सध्या सोशल मीडियावर अनेक लोकांचं कंगनाला समर्थन मिळत आहे. फक्त आणि करण जोहरच नाही तर कंगनाने महेश भट्टांविरुद्धही अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, अभिनेता आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची झाडाझडती सुरू केली. बॉलिवूडचे प्रख्यात निर्माते आणि यशराज फिल्म्सचे सर्वेससर्वा यांची पोलिसांनी चार तास कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून असंख्य प्रश्नांचा भडिमार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या दोन मनोविकार तज्ज्ञांचीही चौकशी केली होती. सुशांत नेमकी कोणती औषधे घेत होता, त्याचा इलाज कसा सुरू होता, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांची कबुली जबाब नोंदवून घेतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ३७ लोकांची कसून चौकशी केली आहे. पोलीस अजूनही काही लोकांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुशांतसिंहने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OHSMRa