मुंबई- आज सुशांतसिंह राजपूतला जाऊन महिना झाला. या महिन्याभरात सुशांत एकाक्षणासाठीही त्याच्या चाहत्यांच्या मनातून दूर गेला नाही. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते तिला खंबीर होण्यासाठी सांगत आहेत. अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक दिवा पेटवला आहे. या दिव्याच्या बाजूला पांढऱ्या रंगाची फूलंही आहेत. या फोटोला कॅप्शन देनाता अंकिताना फक्त 'देवाचं मुल' एवढंच लिहिलं. या दोन शब्दांमधल्या तिच्या वेदना आज अनेकांनी अनुभवल्या. अंकिताच्या या पोस्टवर अनेकांनी तिला खंबीर होण्याचा सल्ला दिला. अंकिता सोशल मीडियावर महिन्याभरापर्यंत सक्रिय होती. सुशांतच्या जाण्यानंतर तिने एकही पोस्ट शेअर केली नाही. अंकिताने शेवटची पोस्ट सुशांतच्या जाण्याच्या एक दिवसआधी १३ जूनला केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी अंकिता त्याच्या वांद्रे येथील घरी कुटुंबाला भेटायला गेली होती. याशिवाय ती पटणातही कुटुंबातील इतर सदस्यांना भेटायला गेली होती. टीव्ही इण्डस्ट्रीतील बेस्ट जोडी- '' या मालिकेच्या चित्रीकरणावेळी सुशांत आणि अंकिताची पहिली ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात कधी झालं कळलंच नाही. २०१६ मध्ये सुशांत आणि अंकिता लग्न करणार होते. पण गोष्टी बदलत गेल्या आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. असं असतानाही चाहत्यांसाठी अंकिता आणि सुशांतची जोडी ही टीव्ही इण्डस्ट्रीतील बेस्ट जोडीच राहिली. दोन मानसिक आजारांशी लढत होता सुशांत- दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचं मुख्य कारण हे त्याचं डिप्रेशन असल्याचं सांगितलं जात असून याच्याच उपचारासाठी ते हिंदुजा रुग्णालयात अॅडमिट झाला होता. सुशांतनं आत्महत्याच केली असून हत्येचा कटाचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सुशांतनं आत्महत्या का केली याचंही उत्तर आम्हाला जवळजवळ मिळालं आहे, असंही ते म्हणाले. डिप्रेशनच्या दोन भयावह आजारांनी सुशांतला ग्रासलं होतं. या दोन मानसिक आजारांनीच त्याचा जीव घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. पॅरानोया आणि बायपोलक डिसऑर्डर या दोन आजारांनी सुशांत ग्रासला होता. या आजारांवर हिंदुजा रुग्लालयात त्यानं आठवडाभर उपचार घेतले होते. 'पॅरानोया' हा एक संशयाचा आजार आहे. यात आपल्या जवळच्या व्यक्ती आपला द्वेश करतायत असं वाटू लागतं. एकांतात असताना कोण तरी आपल्याला संपवण्यासाठी प्रयत्न करतंय, असा विचार सतत डोक्यात येत असतो. तसंच बायपोलक आजारात व्यक्तीच्या स्वभावात सतत चढउतार पाहायला मिळतात. कधी तो एकदम तणावात असतो तर कधीतरी व्यक्तीचा आत्मविश्वास अचानक वाढतो. त्यामुळं हे दोन आजार त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32f2imx