Full Width(True/False)

रिया चक्रवर्ती करायची जादूटोणा, सुशांतच्या बहिणीने नोंदवला जबाब

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी पटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली. रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले. यासोबतच सुशांतवर पूर्ण कंट्रोल रियाच ठेवायची आणि त्याला कुटुंबापासून दूर केलं असेही त्यांनी या आरोपात म्हटलं आहे. आता सुशांतची बहीण मीतू सिंहने धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांतने आत्महत्या का केली याचा पुन्हा तपास बिहार पोलीस करत आहेत. टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार, सुशांतची बहीण सुशांतची बहीण मीतू सिंहने बुधवारी चौकशी दरम्यान रिया 'ब्लॅक मॅजिक' करायची असं सांगितलं. ही गोष्ट तिला सुशांतच्या घरी काम करणाऱ्या मुलाने सांगितले. मुंबई पोलीस पुन्हा घेणार जबाब सुशांतच्या घरी काम करणारा मुलगा त्याच्या घराच्या जवळच रहायचा. सुशांतचा मृतदेह काढण्यावेळीही तो घरातच होता. मुंबई पोलीस सुशांतच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेणार आहे. यात , मीतू, प्रियांका आणि ओपी सिंह यांचे जबाब नोंदवण्यात येतील. अनेक कारणांमुळे त्यांचे जबाब नोंदवण्यात आले नव्हते. बिहार पोलिसांनी सुरू केली चौकशी १४ जून रोजी राहत्या घरी सुशांतचा मृतदेह सापडला होता. यानंतर त्याच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला. मात्र पटणामध्ये सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांनीही यासंबंधीचा तपास सुरू केला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30d0IAo