मुंबई: आत्महत्या प्रकरणात सध्या बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या असून तपासाला वेग आला आहे. याच दरम्यान सुशांतची एक्सगर्लफ्रेंड हिनं देखील मौन सोडत काही गोष्टींचा खुलासाचा केला आहे. अंकितानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या डिप्रेशनवरच प्रश्नचिन्हं उपरस्थित केले आहेत. सुशांत हा डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हताच. असं ती म्हणाली. त्याच्या आत्महत्येनंतर त्याला लोकं डिप्रेस्ड म्हणतायत. त्याच्याबद्दल लिहितायत हे पाहून वाईट वाटतं असंही अंकितानं म्हटलं आहे. मी सुशांतसोबत असताना याच्याहून वाईट दिवस पाहिले आहेत. पण त्यालाही तो सहज सामोरं गेला होता. एका लहान शहरातून आलेला मुलगा स्वत:च्या बळावर सर्व काही मिळतो. त्याला पैसा कधीही महत्त्वाचा वाटला नव्हता. त्याला त्याची स्वप्न पूर्ण करण्यात रस होता. पुढील पाच वर्षात काय करायचं आहे, हे तो लिहून ठेवायचा आणि ते त्यानं मिळवलं देखील आहे, अशा व्यक्तीला डिप्रेस्ड म्हणणं योग्य नाही, असं अंकिता म्हणाली. सुशांतला डिप्रेस्ड म्हणून ओळखण्यापेक्षा त्याला हिरो म्हणून ओळखावं असं मला वाटतं, असं म्हणत अंकितानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच, अंकितानं बिहार पोलिसांकडं या प्रकरणाशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. बिहार पोलिसांनी अंकिताला संपर्क केला असता तिने अनेक गोष्टी सांगितल्या. यात 'मणिकर्णिका' सिनेमाच्या प्रमोशनवेळी सुशांतने तिला मेसेज केला असल्याचंही ती म्हणाली. रिलेशनशिपमध्ये फारसा आनंदी नव्हता सुशांत अंकिताच्या सांगण्यानुसार, 'मणिकर्णिका' सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिला मेसेज केला होता. यानंतर खूप वेळ दोघांची चर्चा झाली. यादरम्यान, सुशांत भावुक झाला आणि त्याने रियासोबतच्या नात्यात तो त्रासला असल्याचं सांगितलं. तसंच त्याला हे नातं संपवायचं असल्याचंही तो अंकिताला म्हणाला होता. रिया त्याला फार त्रास देते असल्याचं सुशांतने अंकिताला सांगितलं होतं. सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर अंकितानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं दोन शब्दांत तिला नेमकं काय सांगायचं आहे हे स्पष्ट होत आहे. अंकितानं ' ' असं म्हटलं आहे. म्हणजेच सत्याचा विजय होईल. अंकितानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील तिला या प्रकरणात सुशांतच्या कुटुंबियांसोबत उभं राहण्याची विनंती केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hPBDl1