Full Width(True/False)

'माझा होशील ना' मालिकेतील नयनाबद्दल 'हे' माहित्येय का?

मुंबई:'' या मालिकेमध्ये नयनाचं पात्र साकारणारी अभिनेत्री प्रेक्षकांची आवडती बनली आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच मुग्धाच्या मनात अभिनयाविषयी ओढ निर्माण झाली होती. कल्याणच्या के सी गांधी इंग्रजी शाळेची ती विद्यार्थिनी. शाळेमध्ये वार्षिक कार्यक्रमात सातत्यानं सहभागी होत असल्यामुळे कलांविषयी मनात गोडी वाढत गेली. वक्तृत्व, निवेदन, अभिनयात रस निर्माण होऊ लागला. तेव्हाच मुग्धानं अभिनेत्री व्हायचं ठरवलं. अभिनेत्री होण्याचा हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. कारण तिच्या कुटुंबात ती पहिलीच अशी होती की जिला कलाकार व्हायचं होतं. या क्षेत्रात यशस्वी होऊ का? अशी शंकाही मनात वाटायची. परंतु, कुटुंबानं तिला पूर्ण पाठिंबा दिला. आणि अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास सुरू झाला. कल्याणमधील अनुराग संस्थेच्या 'मदर्स डे' या नाटकात मुग्धाला अभिनय करण्याची संधी मिळावी. या नाटकानं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळवलं. त्याचा प्रयोग ओदिशामध्ये सादर झाला होता. याचदरम्यान मुग्धानं 'गुमसुन' नावाच्या लघुपटात मुख्य पात्र साकारलं, ज्याचं दिग्दर्शन अनंत सुतारे यांनी केलं होतं. कॅमेरासमोर काम करण्याचा तिचा हा पहिलाच अनुभव होता. पुढे मुग्धाला महेश मांजरेकर निर्मित आणि अनिकेत पाटील दिग्दर्शित भयकथा असलेलं 'गुमसुन' या व्यावसायिक नाटकात अभिनय करण्याची संधी मिळाली. या नाटकात तिनं अंतरा नावाचं भुताचं पात्र साकारलं होतं. या नाटकापासून मुग्धाचा अभिनय क्षेत्रात व्यावसायिक प्रवास सुरू झाला. रुपारेल कॉलेजमध्ये असताना अनेक स्पर्धांमध्ये ती भाग घेत होती. महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या 'विठू माऊली' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि टीव्हीवर काम करण्याचं तिचं स्वप्न आकार घेऊ लागलं. पुढे, मंदार देवस्थळी यांची निर्मिती असलेल्या 'फुलपाखरू' मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली. या मालिकेत अधिक काळ काम करता आलं. 'हे मन बावरे' या मालिकेत तिची भूमिका होती. दिग्दर्शनाची आवड असल्यामुळे कल्याणच्या राजयोग संस्थेमार्फत बालनाट्याचं दिग्दर्शन केलं. सध्या ती 'माझा होशील ना' मालिकेत चमकतेय. या मालिकेतील नयना हे विनोदी पात्र ती चांगल्या प्रकारे साकारतेय. प्रेक्षक तिच्या अभिनयाचं कौतुक करताहेत. अभिनेत्री होण्याचं तिनं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरताना दिसतेय. अभिनेत्री व्हायचं हे मी लहानपणीच ठरवलं होतं. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. मी ती मेहनत घेतेय आणि त्या कष्टांचं फळ मला मिळू लागलंय. 'माझा होशील ना'मधील नयनानं मला अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिलीय. या यशात माझ्या कुटुंबाची मोलाची साथ लाभली आहे. प्रेक्षकांकडून होणाऱ्या कौतुकामुळे आणखी काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. -मुग्धा पुराणिक (अभिनेत्री)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WEN9HP