Full Width(True/False)

संगीत प्रेमाने आणलं जवळ, घराण्याने केलं वेगळं

मुंबई- अॅमेझॉन प्राइमची नवी सीरिज ''चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. येत्या ४ ऑगस्टला ही सीरिज प्रक्षेपित होणार आहे. अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती आणि आनंद तिवारी यांचे दिग्‍दर्शन असलेल्या सीरिजचं चित्रीकरण जोधपूरमध्ये झालं आहे. वेगवेगळी पाश्वभूमी असलेल्या दोन तरुण गायकांचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. शंकर- एहसान- लॉय यांनी या सीरिजला संगीतबद्ध केलं आहे. या सीरिजच्या माध्यमातून हे त्रिकूट डिजीटल विश्वात पदार्पण करत आहेत. 'बंदिश बँडिट्स' ही राधे व तमन्‍नाची कथा आहे. राधे हा प्रतिभावान गायक असून त्‍याने आजोबांच्‍या शास्‍त्रीय संगीताचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. तर तमन्‍ना ही उद्योन्‍मुख पॉप सेन्‍सेशन असून तिची भारताची पहिली आंतरराष्‍ट्रीय पॉपस्‍टार होण्याचीइच्‍छा आहे. राधे तमन्‍नाच्‍या प्रेमात पडतो आणि त्‍याच्‍या जीवनात अनेक संकटं येऊ लागतात. तमन्नाचं सुपरस्‍टार होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात राधे मदत करतो. पण यासोबत तो त्याच्या घराण्याचा वारसा मागे सोडतो. पण शेवटी त्याला या दोन्ही गोष्टी मिळवणं शक्य होईल का हे पाहणं रंजक असणार आहे. प्रमुख भूमिका साकारणारा रित्विक भौमिक म्हणाला की, 'माझं 'बंदिश बँडिट्स' सारख्‍या सीरिजमध्‍ये काम करण्‍याचं स्‍वप्‍न होतं. माझ्या पदार्पणामध्‍ये नसीरूद्दीन शाह, राजेश तैलंग, शीबा चड्ढा आणि अतुल कुलकर्णी यांसारख्‍या दिग्‍गज कलाकारांसोबत काम करण्‍याचा माझ्या जीवनातील हा सर्वोत्तम अनुभवांपैकी एक होता. या सीरिजमध्ये तरूण प्रेम, आकांक्षा, आवड व कौटुंबिक मूल्‍यांना सोप्‍या पण प्रबळ पद्धतीने दाखवण्‍यात आले आहे.' प्रमुख अभिनेत्री श्रेया चौधरी म्‍हणाली की, 'माझी आनंद तिवारी यांच्‍यासोबत काम करण्‍याची फार आधीपासूनची इच्‍छा होती. भारतातील सर्वोत्तम कलाकार एका छताखाली आणि त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली याहून मोठी गोष्ट काय असू शकते. माझ्या मते ही सीरिज संगीत व प्रेमाच्‍या हृदयस्‍पर्शी प्रवास अनुभवायला देते. मला आशा आहे की प्रेक्षकांनाही ही सीरिज तेवढीच भावेल जेवढी आम्हाला काम करताना भावली.' दिग्‍गज अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले की, 'मला भारतीय संगीताचे वास्‍तविक रूप, त्याची मोहकता आणि त्याची सुंदरता दाखवणाऱ्या या सीरिजमध्ये काम केल्याचा आनंदच आहे. ही कथा माझ्यासाठी अत्‍यंत अपवादात्‍मक असून तेवढीच खासही आहे. या सीरिजमध्‍ये शास्‍त्रीय आणि पाश्चात्य संगीताचे मधुरमय संयोजन आहे आणि प्रेक्षकांना दोन्‍हींमधील सर्वोत्तम बाबी पाहायला मिळतील. मुळात कथेची मांडणी सुंदररित्या करण्यात आली आहे. याचमुळे सहकुटुंब बसून या सीरिजचा आनंद प्रेक्षक सहज घेऊ शकतात.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jpvBZY