Full Width(True/False)

टॉप चार्ट्सवर पोहोचला JioMart अॅप, १० लाखांहून अधिक वेळा डाउनलोड

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ कडून ऑनलाइन कंज्यूमर ग्रोसरी प्लॅटफॉर्म JioMart अॅप लाँच करण्यात आला आहे. आता बीटा स्टेजमधील जिओ मार्ट अॅप गुगल प्ले स्टोरे आणि iOS अॅप स्टोरवर आला आहे. त्यामुळे हे वेगाने डाऊनलोड करण्यात येत आहे. हे अॅप येताच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. App Annie ने या अॅपला टॉप चार्ट्स मध्ये रँक दिले आहे. वाचाः जिओचा नवीन अॅप शॉपिंग कॅटेगरीत अॅपल अॅप स्टोर मध्ये दुसरा आणि गुगल प्ले स्टोरमध्ये तिसऱ्या पोझीशनवर आला आहे. या अॅपला गुगल प्ले स्टोरवरून आता पर्यंत १० लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. जिओ मार्ट अॅपमध्ये युजर्सला ओम्नी प्लॅटफॉर्म इंटरफेस दिला आहे. याच्या मदतीने आणखी चांगली ऑफर करतो आहे. वाचाः लॉगइन करा ऑर्डर अॅप बेस्ट इंटरफेस युजर्स साठी खूप सोपा असतो. तसेच आयफोन किंवा अँड्रॉयड स्मार्टफोन्सवर जिओ मार्ट अॅपच्या मदतीने शॉपिंग केली जावू शकणार आहे. ग्रोसरी शॉपिंग साठी ऑफर केले जात असलेल्या या अॅपमध्ये युजर्स आपल्या आयडी वरून लॉग इन अॅक्सेस करु शकतील. नवीन ऑर्डर प्लेस करू शकतील. वाचाः २०० शहरात सर्विस रिलायन्स जिओकडून जिओ मार्ट बीटा प्लॅटफॉर्म देशभरात जवळपास २०० शहरात लाँच करण्यात आला आहे. मार्चच्या अखेरमध्ये लाँच करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्मच्या मदतीने टीयर २ आणि टीयर ३ शहरात राहणाऱ्या युजर्संना ऑनलाइन ऑर्डर करू शकतील. याच्या मदतीने फळांपासून भाजीपाला पर्यंत ग्रोसरी प्रोडक्ट्सची होम डिलिव्हरीचा ऑप्शन मिळणार आहे. वाचाः रोज २.५ लाख ऑर्डर जिओ मार्ट अॅपवरून अनेक नवीन ब्रँड्सला जोडण्यात आले आहे. कार्ड्सपासून नेटबँकिंग आणि मोबाइल वॉलेट्स च्या मदतीने पेमेंटचा ऑप्शन युजर्संना मिळणार आहे. तसेच कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट करता येवू शकतो. कंपनीचे सीईओ मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, या प्लॅटफॉर्मवर जवळपास २.५ लाख ऑर्डर मिळतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hAMXBu