लंडन- संपूर्ण जग सध्या करोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहे. सर्वच देश यापासून सुटका मिळवण्यासाठी आपआपल्या परिने प्रयत्नही करत आहेत. याचसाठी अनेक देशांनी यासाठी काही कडक नियमही राबवले आहेत. दरम्यान अभिनेत्री आणि यांच्यावर यूकेमध्ये कायदा मोडल्याचा खटला भरला जाऊ शकतो किंवा दंड आकारला जाऊ शकतो. कायदा मोडल्याप्रकरणी दोन्ही अभिनेत्रींना अटकही करण्यात येऊ शकते. अभिनेत्रींनी मोडला १४ दिवसांचा क्वारंन्टीन नियम सोनम कपूर आणि मौनी रॉयने ब्रिटनमध्ये १४ दिवसांचा क्वारन्टीन लॉ तोडला आणि दुसऱ्यांचं आयुष्य धोक्यात घातलं. याचसाठी त्यांच्यावर खटला भरण्यात येऊ शकतो किंवा १ हजार यूरोचा दंडही आकारला जाऊ शकतो. सोनमने सेंट्रल लंडनहून वर्कआउट करताना आणि मौनीने एका कॅफेत कॉफी पितानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पतीसोबत काही दिवसांपूर्वीच सोनम गेली लंडनला भारतात करोना व्हायरसमुळे सोनम कपूर तिच्या सासरी दिल्लीला होती. तिने लॉकडाउनचा पूर्ण काळ तिथेच घालवला. काही दिवसांपूर्वी ती पती आनंद आहूजासोबत लंडनला आली. तिने यासंबंधीची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिली. शूटिंगसाठी लंडनला गेली मौनी रॉय गेल्या चार महिन्यांपासून मौनी तिच्या एका मैत्रिणीच्या घरी यूएई येथे राहत होती. संपूर्ण लॉकडाउनचा काळ तिने तिथेच घालवला. चार ते पाच दिवसांपूर्वी ती लंडनला गेली. ती म्हणाली की, एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सध्या ती लंडनला गेली. असं असलं तरी नियमांनुसार तिला १४ दिवसांसाठी होम क्वारन्टीन रहावं लागणार होतं. पण मौनीने हा नियम मोडला आणि ती घराबाहेर पडली. यूके सरकारने तयार केले कडक नियम यूके सरकारच्या नियमांनुसार, जर कोणी ब्रिटनला जाण्याचं प्लॅनिंग करत असेल तर त्याला १४ दिवसांसाठी क्वारन्टीन होणं आवश्यक आहे. ८ जूनपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. जर कोणी या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला १ हजार यूरोचा दंड भरावा लागेल आणि त्याच्यावर खटलाही होऊ शकतो. हा नियम फक्त परदेशी नागरिकांसाठीच नाही तर बाहेरच्या देशातून आलेल्या त्यांच्या नागरिकांसाठीही आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Bdmvhx